Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : कमी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका

Summer Crop : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसल्याचे चित्र आहे. पुणे विभागात सरासरी २७ हजार ६२५ हेक्टरपैकी १७ हजार ४११ हेक्टरवर म्हणजेच ६३ टक्के पेरणी झाली आहे. मका, भूईमूग, बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरलेल्या गहू पिकांची काढणी चालू आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भूईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

विभागात उन्हाळी मक्याची ७ हजार ६०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी बाजरीची पाच हजार १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भूईमुगाची ४ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी सोयाबीनची ७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

नगरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. गहू पीक परिपक्व झाले असून २५ टक्के क्षेत्रावरील पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक कणसातील दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून १५ टक्के क्षेत्रावरील पिकाची काढणी झाली आहे.

हरभरा पीक घाटे परिपक्वतेच्या अवस्थेत असून ४० टक्के क्षेत्रावरील काढणी झाली आहे. करडई पीक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहे. सुर्यफूल पीक फुले पक्वतेच्या अवस्थेत आहे. तीळ पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. उन्हाळी हंगामातील मका, बाजरी, भुईमूग व सोयाबीन पिकांची ६४९८ हे. क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

पुण्यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची ९० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. गहू पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून पिकाची काढणी सुरू आहे. मका पिकाची ९५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. हरभरा पिकाची ८० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगामातील मका, ज्वारी व भुईमूग पिकांची ६२५४ हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची ९० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक पक्वतेच्या अवस्थेत असून पिकाची काढणी सुरू आहे. गहू व हरभरा पिकाची ९० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगाम मका, बाजरी व भुईमूग पिकांची ४६५९ हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हाळी मका पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती चांगली आहे. भुईमूग पिकाची उगवण झाली असून पीक परिस्थिती चांगली आहे.

जिल्हानिहाय झालेली उन्हाळी पेरणी ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा -- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्के

नगर -- ८८८६ -- ६४९८ -- ७३

पुणे -- ११,०९४ -- ६२५४ -- ५६

सोलापूर -- ७६४५ -- ४६५९ -- ६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian School of Agriculture : आंध्र प्रदेशात 'इंडियन स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर' स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री नायडू यांचा प्रस्ताव

Maize Procurement: राज्यात गोदामांची अडचण, मक्याची उद्दिष्टाच्या निम्मी खरेदी

Combine Harvesters Distribution: कृषी प्रदर्शनात नोंदणी केलेल्या प्रीत कम्बाईन हार्वेस्टरचे वितरण

Fruit Farming: उत्तम दर्जाची फळे अन् थेट विक्रीतून नफा

Medicinal Farming: विविध औषधी वनस्पतींच्या शेतीचा यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT