Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान

Rain Update : करवीर तालुक्यातील बालिंगा, दोनवडे, वाकरे, कोपार्डे या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. तर हातकणंगले तालुक्यात १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गुरुवारी (ता. १४) रात्री अचानक मुसळधार पाऊस झाला. करवीर, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले तालुक्यात भात आणि भुईमूग काढणाऱ्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

वीटभट्टी व्यावसायिकांचे कच्चा माल भिजल्याने मोठे नुकसान झाले. करवीर तालुक्यातील बालिंगा, दोनवडे, वाकरे, कोपार्डे या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला.

तर हातकणंगले तालुक्यात १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले दुथडी वाहू लागले. पावसाळ्यानंतर अद्याप शेती पंप जोडलेले नाहीत.

माळरानावरील ऊस पिकांना पाण्याची गरज होती. या पावसामुळे अशा ऊस पिकांना दिलासा मिळाला.

दिवाळीनंतर पुढील चार दिवसांत पाऊस पुन्हा पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. ग्रामीण भागात अद्याप भाताची मळणी सुरू आहे. या पावसामुळे मळणीच्या कामातही व्यत्यय निर्माण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT