Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Level : पावसाची दडी; धरणांवर पाणीपुरवठ्याचा भार

Water Crisis : गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात असलेला साठा झपाट्याने घसरू लागला असून सद्यःस्थितीत अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ४० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Amaravati News : जून महिन्यात पावसाने खंड दिल्याने धरणांतील जलसाठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात असलेला साठा झपाट्याने घसरू लागला असून सद्यःस्थितीत अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ४० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

आगामी काळात दमदार पाऊस न आल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा हा मोठा व सात मध्यम प्रकल्पांसह ४८ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण जलसंचय क्षमता १०४७ दलघमी असून सद्यःस्थितीत ४२२ दलघमी इतका साठा शिल्लक आहे.

या जलसाठ्यावर पाणीपुरवठा, सिंचन व औद्योगिक वसाहतीचा पुरवठा अवलंबून आहे. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे धरणे शंभर टक्के भरून त्यामधून विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा मॉन्सूनचे अद्यापही दमदार आगमन झालेले नाही.

जेमतेम ६३ मिमी पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात हे प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा होऊ शकलेला नाही. या उलट नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. पाऊस न आल्यास शेतीसाठीही पाणी सोडण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अप्पर वर्धा धरणात २४३ दलघमी साठा शिल्लक असून त्यावर अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजना व औद्योगिक वसाहतीचा भार आहे. सात मध्यम प्रकल्पांत १०३ दलघमी व ४८ लघुप्रकल्पांत ७६ दलघमी साठा शिल्लक आहे. यातील २७ लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत, तर काहींनी तळ गाठला आहे. आगामी दिवसांत पाऊस न बरसल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणीसाठ्याची स्थिती (दलघमी)

एकूण जलसाठा ४२२

अप्पर वर्धा २४३

शहानूर १८.०९

चंद्रभागा २४.८७

पूर्णा ३५.३७

सपन २७.९०

पंढरी ११.५७

गर्गा ००

बोर्डी नाला १.७०

४८ लघू ७६.०४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT