Shri Ram Ayodhya agrowon
ॲग्रो विशेष

Shri Ram Ayodhya : अशीही राम भक्ती, रामललाना भेटण्यासाठी कोल्हापूर ते आयोध्या केला सायकल प्रवास

sandeep Shirguppe

Ram Mandir Ayodhya : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील अब्दुललाट गावच्या तरूणाने रामावरील भक्तीचा अनोखा प्रवास सुरू केला आहे. मानस महावीर बिंदगे याने १७ दिवसांत १ हजार ८०० किलोमीटर पेक्षाही जास्त सायकल प्रवास करत प्रभू श्री रामल्लांच्या जन्मभूमी अयोध्येत प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी दाखल झाला आहे. मानसने आयोध्येत जात आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अवघ्या २२ वर्षांच्या मानसने अब्दुललाट येथून स्वतःच्या जिद्दीवर फक्त रामावरील भक्तीपोटी कसलाही गाजावाजा न-करता अयोध्येचा प्रवास सुरू केला.

२ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास १७ दिवसांत पूर्ण करत अयोध्येत तो दाखल झाला आहे. कडाक्याची थंडी जोरदार वारा यासगळ्यांना भेदत श्रीराम भक्तीच्या जोरावर एकट्याने प्रवास पूर्ण केला आहे.

मानसने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश असा तीन राज्यांचा प्रवास मानसने केला आहे. आपल्या प्रवासाची सुरूवाती कोल्हापूर जिल्ह्यातील जयसींगपूर मार्गे सांगोला, तुळजापूर, नांदेड, नागपूर, रामटेक, जबलपूर, कटनी, महैर, रीवा, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर असा प्रवास करत तो अयोध्येत दाखल झाला आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातून त्याला मदत मिळाली. तेथील लोकांच्याकडून राहण्याची व जेवणाची सोय चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. त्याचे अनेक ठिकाणी जयश्रीरामाच्या घोषणा देत स्वागत करण्यात आले.

यानंतर तो पुढच्या प्रवासासाठी सायकलने नेपाळला जाणार आहे. सर्वांचा आशीर्वाद व कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे व प्रेरणेमुळे हा धाडसी प्रवास पूर्ण करत असल्याचे त्याने घरच्यांना माहिती दिली. गावासह तालुकावासियांनीही त्याला या प्रवासासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT