Watermelon Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड सुरू झाली होती, पण मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ, पावसाळी वातावरण यामुळे ही लागवड रखडली आहे. लागवड यंदा काहीशी वाढणार असून, सुमारे १००० ते १२०० हेक्टरवर कलिंगड पीक राहील, असे दिसत आहे.

खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प असणार आहे. मागील वेळेस रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात अधिकची घटली होती. खरिपातही लागवड कमीच होती. अनेकांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या कालावधीत आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले होते.

पण पावसाचा पिकास फटका बसला. उत्पादन कमी आले. जळगाव जिल्ह्यात लागवड अधिक असणार आहे. खरिपात जुलै व ऑगस्ट या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. एकूण लागवड ७५ हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. रब्बीत लागवड अधिक असते. त्यात आगाप लागवड या महिन्यात केली जाते.

खानदेशातील लागवड १०० ते १२० हेक्टरने वाढणार आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतच काढणी होईल, या दृष्टीने नियोजन केले आहे. रब्बीतील कलिंगडाची लागवड या महिन्यात ५० ते ६० हेक्टरवर होईल.

तर पुढील महिन्यातील लागवड २०० ते ३०० हेक्टर एवढी राहील, अशी माहिती मिळाली. कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. यात एकट्या जामनेरातील एकूण लागवड २०० ते ३०० हेक्टरवर राहील.

जामनेरातील हिवरखेडा, पळासखेडा, हिंगणे, नेरी, जामनेर, सामरोद, गारखेडा, तोंडापूर व अन्य भागात कलिंगडाची लागवड करण्यात येते. चोपड्यातही माचले, गोरगावले, लोणी, पंचक, यावलमधील डांभुर्णी, किनगाव, साकळी व परिसरात कलिंगड पीक असते.

या भागतही लागवड यंदा कमी झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात कलिंगड लागवड वाढू लागली आहे. मध्य प्रदेशातील जळगावलगतच्या भागात लागवड वाढली आहे. तेथील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील इच्छापूर, नाचणखेडा, दापोरी, फोपनार, लोणी व तापीकाठालगत लागवड पुढील महिन्यात सुरू होईल, असे संकेत आहेत.

...या भागांत लागवड शक्य

लागवड जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील धुळे, नंदुबारातील शहादा, तळोदा होत आहे. अन्य भागांत मात्र लागवड अनेकांनी टाळली आहे. आतापर्यंत खानदेशात मिळून ४० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड पुढील महिन्यातही काही शेतकरी करतील. लागवड आता पुढील मार्चपर्यंत सुरू राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT