Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रत्नागिरीत २८५१ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड

Rabi Season : यंदा मॉन्सून लवकर परतल्यामुळे त्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. यंदा भाजीपाला, कडधान्य लागवड कमी झाली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : यंदा मॉन्सून लवकर परतल्यामुळे त्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. यंदा भाजीपाला, कडधान्य लागवड कमी झाली आहे. दरवर्षी साडेपाच हजार हेक्टरवर रब्बी हंगामात लागवड केली जाते; मात्र यंदा आतापर्यंत २ हजार ८५१ हेक्टरवर लागवड झाली आहे. याला जिल्हा कृषी विभागानेही दुजोरा दिला आहे.

कोकणात रब्बी पीक मोठ्या प्रमाणात घेतली जात नाहीत. पावसाळा संपला की भातकापणीला प्रारंभ होतो. नोव्हेंबरमध्ये पाण्याचा उद्भव असलेल्या ठिकाणी भाजीपाला, कडधान्य यासह भात लागवड केली जाते. उत्पन्नाचे साधन म्हणून याचा उपयोग करणारी कुटुंबे अत्यंत कमी होती; मात्र महिला बचत गट स्थापनेची मोहीम वेगाने राबविल्यानंतर रब्बी हंगामातील लागवडीचा उपयोग उत्पन्नाचे साधन म्हणून होऊ लागला आहे.

रब्बी हंगामातील क्षेत्र वाढीसाठी आत्मा योजनेमधून बियाणे किट वितरित केले जाते. काही ठिकाणी हिवाळ्यात वायंगणी शेती करतात. यंदा सप्टेंबरअखेरीस पाऊस थांबला. त्यानंतर अवकाळी पाऊसही मोजक्याच ठिकाणी नोंदला गेला.

पुढील दोन महिने उन्हाचा कडाकाही तेवढाच होता. त्याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीवर होत असून अनेक ठिकाणी विहिरींची पातळी कमी झाली आहे. पाणी उपलब्ध नसल्यामुळे भाजीपाला लागवड कमी आहे. आतापर्यंत ५१ टक्के लागवड झाली आहे.

यंदा पावस परिसरातील आमच्या शेतामधील विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील भाजीपाला लागवड करणार नाही. पाऊस कमी झाल्यामुळे कदाचित विहिरींनी तळ गाठला असावा. गेल्या चार महिन्यांत अडीच किलोमीटरवरून पाणी आणून त्यावर पडवळाचे उत्पादन घेतले.
चंद्रकांत शेडगे, शेतकरी
यंदा अपेक्षेपेक्षा रब्बी हंगामातील लागवड कमी झाली आहे. पाणी उपलब्ध नसल्यामुळे हा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बंधारे बांधून लागवड करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

लागवडीखालील क्षेत्र

एकूण क्षेत्र ५ हजार ५९.९

लागवडीखालील २ हजार ८५१.९

टक्के ५६.३६

मका १.३१ हेक्टर

इतर तृणधान्य ३.१ हेक्टर

हरभरा ०

कडधान्य २७०४.७ हेक्टर

सूर्यफूल २.०२ हेक्टर

गळीतधान्य १४७.२६ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT