Fodder Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Cultivation : गायरान जमिनीवर चारा लागवड करा

Gayran Land : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) गायरान आणि वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीला मंजुरी देण्यात आली आहे.

Team Agrowon

Latur News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) गायरान आणि वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील गायरान जमिनींवर जनावरांसाठी चारा लागवड मोहीम घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी सूचना (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष अॅड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केली.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे व जनसंपर्क अधिकारी महेंद्र गायकवाड यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

गायरान जमिनीवर चारा लागवड केल्यास अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांच्या जनावरांना सहज चारा उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणे शक्य होईल आणि त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण होईल. गायरान जमिनीवर चारा लागवड करताना संबंधित ग्रामपंचायतीला सहभागी करून घेतल्यास चारा लागवडीचे नियोजन व्यवस्थितपणे होऊ शकेल. चारा लागवड करताना कृषी विभागाने जमिनीची प्रतवारी तपासून कोणत्या प्रकारच्या चाऱ्याची लागवड करता येईल, या बाबत संशोधन करावे आदी सूचना हेलोंडे पाटील यांनी केल्या.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होत असल्याने त्यावरील कीड, रोग नियंत्रणासाठी आवश्यक जैविक खतांच्या निर्मितीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर शेतीशाळेचे आयोजन करून त्यांना जैविक खते बनविण्याबाबत मार्गदर्शन करावे. पंतप्रधान पीकविमा योजना राबविणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींची नावे आणि संपर्क क्रमांक सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करावेत. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती तातडीने देणे शक्य होईल.

विविध योजनांचा घेतला आढावा

जिल्हा वार्षिक योजनेतून पशुसंवर्धन विभागाला चारा लागवडीसाठी निधी देण्यात आला होता. यातून पशुपालक शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यात हा चाराटंचाई भासली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकूर यांनी दिली. या वेळी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा हेलोंडे पाटील यांनी आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT