Maharashtra Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : दसऱ्याच्या मुहूर्तावर 'सोमेश्वर'चा गळीत प्रारंभ

Someshwar Sugar Factory Baramati : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दसऱ्यादिवशी (ता. 24) मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे.

संतोष शेंडकर 

Baramati News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दसऱ्यादिवशी (ता. 24) मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे.

राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर व उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात येत आहेत. यानिमित्ताने ते काय बोलणार याची तसेच कारखान्याच्या विविध प्रश्नांवर काय भूमिका मांडतात याचीही शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे याप्रसंगी कार्यक्षेत्रातील पुरंदरचे आमदार संजय जगताप, खंडाळाचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीमध्ये काही महिन्यांपूर्वी फूट पडली आणि अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री निवड झाल्याबद्दल आणि आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही पटकावल्याबद्दल कारखान्याने त्यांचा सत्कार समारंभही आयोजित केला आहे. करंजेपुलच्या मुख्य चौकापासून कारखान्यापर्यंत त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्याचे नियोजन आहे.

पक्षात दोन गट झाल्यांतर पवार तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच आले आहेत. घरच्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी ते काय संवाद साधतात याची उत्सुकता आहे. सोमेश्वरने 3350 रुपये प्रतिटन असा उच्चांकी दर त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिला आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत हा उच्चांकी दर जाहीर करण्याची संधी पवार यांनी साधली.

आता येत्या हंगामात एफआरपी एकरकमी देण्याबाबतही त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच सध्या सत्ताधारी व विरोधक यांच्यातही पंधरा कोटी ठेव विमोचन निधीची कपात, साखर वाटप, वाघळवाडीस पावणेपाच एकर जागा, काकडे महाविद्यालयाची मालकी आदी विषयांवरून वाद प्रतिवाद सुरू आहेत.

तर कारखान्याच्या शिक्षण संस्थेने विद्यमान स्वीकृत संचालक व बिल्डर अजय कदम यांच्या विरोधातला 'इमारतीचे काम अपूर्ण ठेवल्याचा' न्यायालयीन दावा जिंकला आहे. कदम यांना न्यायालयाने ९३ लाख रूपये व्याजासह शिक्षणसंस्थेस देण्याचा आदेश केला आहे, अशा विषयांवरही पवार यांच्या भूमिकेचे औत्सुक्य आहे.

सोमेश्वरच्या विद्यमान स्वीकृत संचालकांचा एक वर्षाचा कालावधी संपून आठ महिने उलटले आहेत. अनेक कार्यकर्ते आपल्याला संधी मिळावी या प्रतिक्षेत आहेत. 'माळेगाव'च्या स्वीकृतच्या निवडीही नुकत्याच झाल्या.

आता पवार यांच्या आगमनामुळे सोमेश्वरच्या 'स्वीकृत' संचालकांचा विषय मार्गी लागेल तसेच दोन वर्षांपासून कामगार संचालकाची निवडही प्रलंबित आहे त्यावरही तोडगा निघेल, अशी पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT