Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कुवे येथे वादळी पावसामुळे पिके भुईसपाट

Unseasonal Rain : कुवे परिसरात शुक्रवारी (ता. १) दुपारी वादळ आणि पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला.

Team Agrowon

Shirpur News : तालुक्यातील कुवे परिसरात शुक्रवारी (ता. १) दुपारी वादळ आणि पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतातून काढून ठेवलेला शेतमाल जमिनदोस्त झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

कुवे परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनला वादळ व पाठोपाठ पावसाने अर्धा तास धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या अस्मानी आपत्तीमुळे शेतकरी भांबावून गेले. त्यांच्या डोळ्यादेखत तयार झालेला शेतमाल हवेत उधळला गेला. पाठोपाठ उभी पिकेही कोलमडून पडली. कष्टाने फुलवलेला शेतमाल वाहून जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

मका, हरभरा, बाजरी, गहू, ज्वारी आदी पिकांसाठी कुवे परिसर प्रसिद्ध आहे. मक्याच्या पेरणीला तीन महिने पूर्ण झाले आहेत. यंदा दीर्घकाळ थंडी असल्यामुळे गहू आणि हरभराही जोमात होते. काही ठिकाणी कापणी करुन पिके वाळवण्यासाठी बांधावर, खळ्यात ठेवली होती.

उर्वरित पिके काढणीच्या अवस्थेत होती. वादळाने बांधावरील शेतमाल उडवून नेला तर शेतातील उभी पिके जमीनदोस्त केली. हाताशी शिल्लक शेतमाल वेचून सुरक्षित ठिकाणी नेण्यात शेतकरी गुंतले आहेत. दरम्यान, परिसरात अद्यापही अभ्राच्छादित वातावरण असल्याने बळिराजा चिंतेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT