Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ७५ हेक्टर क्षेत्र बाधित

Post Mansoon Rain : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा ७५ हेक्टरवरील भाजीपालासह अन्य पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे सुमारे २०० ते २५० शेतकरी बाधित झाले आहे.

Team Agrowon

Thane News : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा ७५ हेक्टरवरील भाजीपालासह अन्य पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे सुमारे २०० ते २५० शेतकरी बाधित झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तर, काही ठिकाणी जोरदार गारपीठ झाली. ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे भाजीपालासह भात आणि अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ७५ हेक्टरवरील भाजीपाल्यासह अन्य पिकांचे नुकसान झाले असून सुमारे २०० ते २५० शेतकरी यामध्ये बाधित झाले आहेत.

पिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे

वज्रेश्वरी (बातमीदार) : भिवंडी लोकसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

सध्या भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड आणि वाडा तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर भाताच्या मळणीची कामे सुरू आहेत; मात्र अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवून घेतला गेला. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती केंद्रीय पाटील यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT