Farmer Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पीकनुकसान अनुदान वाटपाची पडताळणी सुरू

Agriculture Compensation Scam : नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक नुकसान अनुदान वाटपात जालना जिल्ह्यात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले.

Team Agrowon

Parbhani News : नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक नुकसान अनुदान वाटपात जालना जिल्ह्यात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. त्या पार्श्‍वभूमीवर परभणी तसेच मराठवाड्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील २०२१ ते २०२४ पर्यंत झालेल्या अनुदान वाटपाची पडताळणी करण्यात येत आहे.

त्यासाठी गाव नमुना क्रमांक ८ अ नुसार शेतकरी खातेदार व त्यांना वाटप करण्यात आलेली अनुदान रक्कम आदी बाबतची माहिती संकलित केली जात आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

२०२२ ते २०२४ या कालावधीत अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याबद्दल जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची चौकशी केल्यानंतर अंबड, घनसावंगी तालुक्यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी ४० कोटी रुपयांचे हडपल्याचे उघडकीस आले.

यानंतर संबंधितांना निलंबित करण्यात आले. पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत २०२१ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्ती अंतर्गंत अनुदान वाटपाची प्रक्रियेत २०२२ नंतर बदल झाले आहेत. पीकनुकसानीच्या पंचनाम्यानंतर संबंधित तलाठी गावातील बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून प्रत्येक शेतकरी खातेदारास विशिष्ट क्रमांक देऊन यादी तयार करतात. ही यादी पोर्टलवर अपलोड केली जाते.या विशिष्ट क्रमांक प्राप्त शेतकरी खातेदारांनी ई केवायसी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

परभणी जिल्ह्यात २०२३-२४ आणि २०२४-२०१५ या या वर्षी नैसर्गिक आपत्ती अंतर्गंत ११ लाख ७२ हजारांवर बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी ८५४ कोटी २७ लाख रुपयावर निधी मंजूर आहे. त्यापैकी ९ लाख ३९ हजारांवर शेतकऱ्यांना ७३० कोटी २० लाखावर अनुदान वाटप करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमीन धारणा क्षेत्राच्या तुलनेत अतिरिक्त अनुदान वाटप केल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या आहेत. शेतकरी खातेदाराचे नमुना नंबर ८ अ नुसार जमीन धारणा क्षेत्र आणि वाटप केलेली रक्कम यांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अनुदान वाटपातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल. गैरप्रकारही उघड होऊ शकतील. त्यासाठी तालुकानिहाय अनुदान वाटपाची माहिती संकलित करण्याच्या कामी महसूल यंत्रणा लागली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT