Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सोलापूर जिल्ह्यात पीककर्ज वाटप ४८.८७ टक्क्यांवर

Rabi Season Crop Loan : या हंगामात सर्वाधिक पीककर्जाची मागणी होते, त्यानुसार त्याचे वाटप होणे अपेक्षित आहे. पण यंदा आतापर्यंत जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मिळून केवळ ४८.८७ टक्के एवढेच कर्ज वाटप होऊ शकले आहे.

Team Agrowon

Solapur News : खरिपानंतर आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी गणला जातो. त्यामुळे या हंगामात सर्वाधिक पीककर्जाची मागणी होते, त्यानुसार त्याचे वाटप होणे अपेक्षित आहे. पण यंदा आतापर्यंत जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मिळून केवळ ४८.८७ टक्के एवढेच कर्ज वाटप होऊ शकले आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांना खरीप हंगामात २४९८.५६ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण त्यापैकी २०९०.१० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले. खरिपातील आकडेवारी बऱ्यापैकी दिसत असली, तरी त्यासाठी मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागली.

त्यानंतर आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे. या हंगामासाठी २००१.४९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण त्यापैकी आतापर्यंत केवळ १०९.२६ कोटी रुपयांचे वाटप होऊ शकले आहे. या दोन्ही हंगामातील पीककर्ज वाटपाच्या आकडेवारीने ५० टक्क्यांची पातळीही ओलांडलेली नाही. यावरून बँकांची उदासीनता दिसून येते.

आकडे वाढले, पण शेतकरी संख्या नाही

सर्वसाधारणपणे जुन्या कर्जदारांनाच पुन्हा कर्ज देण्याकडे बँकांचा कल अधिक आहे. नव्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना नियम अटी आणि वेगवेगळ्या कारणाने त्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे नव्या कर्जदारांची संख्या अगदीच कमी आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या १५ लाखांवर असतानाही बॅंकांकडून रब्बीचे कर्ज मिळलेल्यांची संख्या ८५ हजार ते एक लाख ३५ हजारांपर्यंतच दर वर्षी दिसते आहे. साहजिकच, कर्जवाटपाचे आकडे वाढले, तरी शेतकऱ्यांची संख्या मात्र वाढत नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT