Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : पीकविमा अग्रिमपोटी ३५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात

Crop Insurance Update : जिल्हा प्रशासनाच्या दबावानंतर विमा कंपनीने नमते घेत शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्‍के अग्रिम जमा करण्यास सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Nagpur News : जिल्हा प्रशासनाच्या दबावानंतर विमा कंपनीने नमते घेत शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्‍के अग्रिम जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५१ हजार ९५५ शेतकऱ्यांच्या खात्यात ३५ कोटी एक लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक रवींद्र मनोहरे यांनी दिली.

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस या कारणांमुळे सोयाबीनचे मोठे नुकसाने झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मिड सिझनअंतर्गंत २५ टक्‍के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार कंपनीकडून सर्व्हेक्षण, पंचनामे करून मिड सिझन अंतर्गंत ६३ हजार ७७५ शेतकऱ्यांना पात्र ठरविले. या शेतकऱ्यांकरिता ५२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील ५१ हजार ९९५ शेतकऱ्यांना २५ टक्‍के अग्रिम भरपाईची रक्‍कम जमाकरण्यात आली असून एकूण परतावा आजपर्यंत ३५ कोटी १ लाख रुपयांचा झाला आहे.

विमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी त्या संदर्भाने खंबीर भूमिका घेतली होती. त्यामुळेच २५ टक्‍के अग्रिम भरपाई म्हणून ६३ हजार ७७५ पैकी ५१ हजार ९५५ शेतकऱ्यांना ३५ कोटी एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT