Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Fraud : शुल्क मिळविण्यासाठी एक चौरस शेतीचा विमा

Agriculture Department : शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरून दिल्यानंतर संगणकचालकाला ४० रुपये शुल्क मिळत असल्यामुळे चक्क एक चौरस किंवा एक गुंठा शेतीचा विमा काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड होत आहेत.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरून दिल्यानंतर संगणकचालकाला ४० रुपये शुल्क मिळत असल्यामुळे चक्क एक चौरस किंवा एक गुंठा शेतीचा विमा काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. कृषी विभागाने जवळपास अशी २१४ प्रकरणे शोधून काढली आहेत.

गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रात (सीएससी) शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरून दिल्यानंतर केंद्रातील संगणकचालकाला ४० रुपये अधिकृत शुल्क मिळते. दिवसभरात दहा अर्ज भरल्यास ४०० रुपये मोकळे होतात.

केंद्रचालकांकडे शेतकऱ्यांचे सर्व तपशील असतात. त्यामुळे गैरप्रकाराला चालना मिळते. विशेष म्हणजे अर्ज चुकीचा भरला गेल्यास त्याची जबाबदारी केंद्रचालकाची नसते. त्यामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यालाच झळ सोसावी लागते. विमा अर्ज शुल्क मिळवण्याच्या हव्यासापोटी मिळेल त्या शेतकऱ्याचे अर्ज भरण्याचे काम केले जाते.

जमीन अत्यंत थोडी व पीक नसले तरी अर्ज भरण्याचे प्रकार होतात. विशेष म्हणजे शेतकऱ्याला कितीही कमी भरपाई देण्याची वेळ आल्यास भरपाईची रक्कम किमान एक हजार रुपये असावी, असा दंडक शासनाचा आहे. त्यामुळे अगदी चौरस फुटातील पिकांचा विमा काढला जात आहे.

कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले, की प्रत्येक पात्र दाव्यातील अर्जासाठी किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई मिळते, अशी चर्चा गावपातळीवर असते. त्यामुळेच अत्यंत कमी क्षेत्रातील पिकाचा विमा काढला जातो.

विमा संरक्षित क्षेत्र कमी असले तरी किमान रक्कम मिळणार असल्यामुळे असे प्रकार वाढीस लागलेले आहेत. कृषी विभागाच्या पडताळणीत २१४ निवडक प्रकरणे तपासण्यात आली. यात विमा संरक्षित रक्कम शंभर रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच, विमा संरक्षित क्षेत्र अत्यंत कमी आहे. या गंभीर बाबी शासनाच्या निदर्शनास आणल्या जात आहेत. परंतु, यावर अद्याप प्रभावी उपाय सापडलेला नाही.

अत्यंत कमी शेतजमिनीसाठी २०२३ मधील खरीप हंगामात काढण्यात आलेल्या विमा प्रकरणांची संख्या लाखाच्या घरात आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एक लाख २७ हजार प्रकरणांमध्ये विमा संरक्षित रक्कमच एक हजार रुपयांच्या आत आहे. विशेष म्हणजे यातील सहा हजार प्रकरणांमध्ये विमा संरक्षित रक्कम शंभर रुपयांच्या आत आहेत.

म्हणजेच अशा प्रकरणांमध्ये विमा मंजूर झाला तरी तो १०० रुपयांच्या आत असेल व तो मिळण्यासाठी मी अर्ज करीत असल्याचे अर्जदारांच्या वतीने नमूद केले जाते. १०० रुपये ते ५०० रुपये या दरम्यान विमा संरक्षित रक्कम असलेली प्रकरणे ४३ हजारांहून अधिक आढळली आहेत. तर केवळ ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षित रक्कम असलेल्या प्रकरणांची संख्या ७७ हजारांपेक्षा जास्त आहे.

कुंडीतील शेतीचा उतरवला जातो विमा

‘‘एक चौरस फुटातील शेतीचा विमा उतरला जात असल्यास ही शेती कुंडीतील असू शकते. अत्यल्प जागा आहे म्हणून विमा कमी काढला जातो की विमा भरपाई मिळते म्हणून कमी जागेची नोंद करून विमा अर्ज भरले जातात याचीही तपासणी सुरू आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT