Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : हिंगोलीत ७९ हजारांवर हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : हिंगोली जिल्ह्यात सोमवार (ता. २७) ते बुधवार (ता. २९) या कालावधीत मान्सूनोत्तर पाऊस झाला. अनेक मंडलात अतिवृष्टी झाली. पुराचे पाणी शेतात शिरले.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात सोमवार (ता. २७) ते बुधवार (ता. २९) या कालावधीत मान्सूनोत्तर पाऊस झाला. अनेक मंडलात अतिवृष्टी झाली. पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे खरिपातील तूर, कपाशी, रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू यासह भाजीपाला, फळपीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राथमिक नजर अंदाज अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ७९ हजार ४०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम बाधित क्षेत्र निश्चित होईल.

हिंगोली जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सोमवारी (ता. २७) जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडात सरासरी ६५.८ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली, बासंबा, डिग्रस कऱ्हाळे, माळहिवरा, कळमनुरी, नांदापूर, वाकोडी, हट्टा, औंढा नागनाथ, येळेगाव, साळणा, जवळा बाजार या १२ मंडलात अतिवृष्टी झाली.

नाले, नद्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरले. अनेक भागात वाढलेली ज्वारी, तुरीचे पीके आडवी झाली आहेत. वेचणी राहिलेला कापूस भिजल्याने प्रत खराब झाली. बोंडातून कापूस गळून पडला. भाजीपाला, फळपीकांचे नुकसान झाले आहे. पीकनुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.

अंतिम बाधित क्षेत्र निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची मागणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. मान्सूनोत्तर पावसात औंढा नागनाथ तालुक्यात वीज पडून १ व्यक्तीचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले.

हिंगोली तालुक्यात १, वसमत, सेनगावात प्रत्येकी २ तर औंढा नागनाथ तालुक्यात ५ जनावरे मिळून एकूण १० जनावरे जखमी झाली. कळमनुरी, वसमत तालुक्यातील प्रत्येकी १ व औंढा नागनाथ तालुक्यातील ५ असे एकूण ७ घरांची अंशतः पडझड झाली.

प्राथमिक नजर अंदाज पीकनुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका बाधित क्षेत्र

हिंगोली १२३४८

कळमनुरी २३३३५

वसमत ८००

औंढा नागनाथ १७३७१

सेनगाव २५५४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT