Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Unseasonal Rain: पाऊस, गारपिटीमुळे पीकहानी वाढली

Crop Damage: खानदेशात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात दोन-तीन दिवस विविध भागांत वादळी पाऊस, गारपीट होऊन पीकहानी वाढली आहे. पंचनम्यांची व्याप्तीही वाढवावी लागेल, अशी स्थिती खानदेशात आहे. सर्वत्र केळी, भाजीपाला व चाऱ्याचे नुकसान झाले आहे.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात बुधवारपर्यंत (ता. ७) सुमारे ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ३० मिलिमीटर पाऊसही या भागात झाला. कळवंद, वाळदे, जातोडे, आमोदे, दहीवद, असली, कळमसरे, पिंप्री, अजंदे, वाघाडी, अर्थे, टेंभे, लौकी, तरडी या भागांत अधिक पीकहानी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. परंतु पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. तसेच अनेकांचे पंचनामे टक्केवारीच्या खेळात टाळले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पारोळा, जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, साक्री, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार अशा सर्वच भागांत बुधवारी (ता. ७) दुपारीदेखील पाऊस झाला.

काही भागांत अधिकचा पाऊस व वादळ झाले. तर काही भागांत हलका ते मध्यम पाऊस व सुसाट वारा होता. यामुळे नुकसान पातळी बुधवारच्या पाऊस, वादळात आणखी वाढली आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून आपला अहवाल लागलीच सादर करणे आवश्यक असते.

परंतु रोज पाऊस व गारपीट, वादळ अशी स्थिती आहे. गुरुवारीदेखील (ता. ८) सकाळी खानदेशात काही भागात सुसाट वारे व पाऊस अशी स्थिती होती. जळगाव, धरणगाव, चोपडा, जामनेर आदी भागांत सकाळपासून पावसाळी वातावरण होते. गुरुवारीदेखील पावसाचे संकेत असल्याने नुकसान पातळी वाढणार असल्याची स्थिती आहे.

नुकसानीची माहिती आज मिळणार

खानदेशात मंगळवारीच (ता. ६) पंचनामे सुरू करण्यात आले. बुधवारीदेखील पंचनामे सुरू होते. तसेच गुरुवारीदेखील ही कार्यवाही प्रशासन राबवित होते. नुकसान अहवाल धुळ्यातील शिरपूर येथे प्राप्त झाला. तसेच जळगाव तालुक्यातील नुकसान अहवालदेखील प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. परंतु चाळीसगाव, भडगाव या भागात बुधवारीदेखील वादळ, गारपीट झाल्याने गुरुवारीदेखील या भागात पंचनामे सुरू होते, अशी माहिती मिळाली. यामुळे नुकसानीची माहिती शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी प्राप्त होईल, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

ICAR Farmer Awards: ‘आयसीएआर’च्या कृषी पुरस्कारात गृहमंत्रालयाचा खोडा

Farmer Protest: कृषी वायदे बाजार मुक्तीसाठी शेतकरी संघटना करणार आंदोलन

Admission Criteria: कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी गुणांची अट शिथिल

Lumpy Disease: मोकाट जनावरांमुळे फैलावतोय ‘लम्पी’ आजार  

SCROLL FOR NEXT