Forest Land Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Land Crisis: वनसंज्ञेमुळे संकट

Farmers Issues: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनसंज्ञा लागलेली आहे.

Team Agrowon

Murbad News: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनसंज्ञा लागलेली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने विविध योजना राबवण्याबरोबर कर्ज घेण्यातही अडचणी येत आहेत.शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर खासगी वने व वनेत्तर कामास बंदी असल्याची नोंद आहे.

त्यामुळे जमीन विकसित करण्यात येणाऱ्या अडचणी, वन विभागाकडून होणारी पिळवणुकीबाबत विधानसभेत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी लक्षवेधी मांडली होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत याच अनुषंगाने बैठक घेतली होती. या बैठकीत १९ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील नोंदी रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देण्यात आला होता.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या खातेदारांना दुसऱ्या टप्प्यात १२ हेक्टर खालील शेतकऱ्यांच्या ३५ सेक्शनच्या नोंदी हटवण्याबाबत चर्चा झाली होती. महाराष्ट्र राज्यातील सुमारे १,६५,९०० शेतकरी खातेदारांच्या जमिनीवरील वन संज्ञेच्या नोंदी रद्द करून त्यांना न्याय देण्याबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन वर्षांपूर्वी दिले होते.

दरम्यान, अद्यापपर्यंत नोंदी रद्द झालेल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे १२ हेक्टरपेक्षा जास्त जमीन होती. त्या जमिनीला वन संज्ञा लागली आहे. त्यानंतर सरकारने छोटे शेतकरी असलेल्यांच्या सातबारा उताऱ्यावर वने अशी नोंद केल्याने कूळ कायद्याने मिळालेल्या जमिनीवर वने अशी नोंद घेतली आहे. त्यामुळे मालकीच्या जमिनीवर विकासकामे करता येत नाही.
- मारुती कोर, शेतकरी, असोळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT