Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी विभागाकडून छापासत्र सुरूच

Illegal Cotton Seed : पहिली कारवाई बाभूळगाव तालुक्यातील सावर-नागरगाव मार्गावर केली. त्यानंतर दुसरी कारवाई नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे करण्यात आली.

Team Agrowon

Yavatmal News : अनधिकृत कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाच्या पथकाने दुसऱ्या दिवशी छापासत्र कायम ठेवले. पहिली कारवाई बाभूळगाव तालुक्यातील सावर-नागरगाव मार्गावर केली.

त्यानंतर दुसरी कारवाई नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे करण्यात आली. दोन्ही कारवाईत दोन लाख रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले. सावर (ता. बाभूळगाव) येथे केलेल्या कारवाईत शेख आदिल शेख जाकीर (वय २२) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

माणिकवाडा (ता. नेर) येथे रोशन ऊर्फ राजू शेलोकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा शिरकाव सुरू झाला आहे. याविरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे.

शनिवारी दोन ठिकाणी कारवाई केल्यानंतर रविवार व सोमवारी कृषी विभागाने पुन्हा कारवाईचे सत्र कायम ठेवले आहे. रविवारी (ता. २५) बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे अनधिकृत कापूस बियाणे विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून चाचपणी केली. आरोपी शेख आदिल शेख जाकीर याला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने बोगस बियाणे विक्री करीत असल्याची माहिती पथकाला दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT