Leopard Attack agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Forest Officers Kolhapur : नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती दाजीपूर वन्यजीवचे परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांनी दिली.

sandeep Shirguppe

Leopard Attack Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा या तालुक्यात अनेकवेळा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान राधानगरी तालुक्यात गव्यांच्या हल्ल्यानंतर आता बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत.

राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस दुर्गम भागात असलेल्या मानबेट पैकी धनगरवाडा येथील लहू बाबू गावडे या शेतकऱ्याची गाय बिबट्याने ठार केल्याची घटना काल (ता.०२) मध्यरात्री घडली. आज शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने मानबेट परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामणी पाटबंधारे प्रकल्प आणि दाजीपूर अभयारण्याच्या सीमेवर मानबेटचा धनगरवाडा आहे. याठिकाणी गावडे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. लहू गावडे यांच्या गोठ्याचे बांधकाम सुरू असल्याने जनावरे त्यांनी खुल्या जागेत घराच्या मागे बांधली होती. यातील एक देशी गाय झाडाखाली बसली होती.

मध्यरात्री बिबट्याने देशी गायीवर हल्ला करून तिला ठार केले. यावेळी अचानक हालचाल दिसत असताना गावडे कुटुंबातील पुरूषांनी बाहेर येत पाहणी करतात बिबट्या मागील बाजूने गाईचा फरशा पडत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्या शेजारच्या जंगलाकडे पसार झाला.

याबाबत विश्वास बुक्कम यांनी वन विभागाला माहिती दिली. वनपाल धनाजी पाटील आणि वनरक्षक सुनील हराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी बिबट्याचे ठसे आढळून आल्याने बिबट्याचा वावर असल्याच्या घटनेला दुजोरा देण्यात आला.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती दाजीपूर वन्यजीवचे परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांनी दिली. भीतीच्या छायेखाली असलेला मानबेटचा धनगर वाडा विजे अभावी कायमच अंधारात असून, जिल्हा नियोजन विकास मंडळाकडे निधी अभावी प्रलंबित असलेला विज पुरवठ्याचा प्रस्ताव प्रशासनाने त्वरित मंजूर करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT