Cow Milk Price agrowon
ॲग्रो विशेष

Cow milk Rate : गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात, पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाचा निर्णय

western Maharashtra Milk : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात केली आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झटका दिला आहे.

sandeep Shirguppe

Cow Milk Rate Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात केली आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झटका दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केल्याची माहिती समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या राजारामबापू दूध संघ, गोकुळ, वारणा, भारत डेअरीसह दूध संघांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत दूध दर कपातीचा निर्णय झाला. विधानसभेचे मतदान झाल्यानंतर तातडीने दूध संघांनी हा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना झटका दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गोकुळचा गायीच्या दुधाचा खरेदी दर सध्या ३३ रुपये असून त्यात ३ रुपयांची कपात करुन ३० रुपये करण्यात येणार आहे. याबदद्ल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गाय दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत असल्याने ही दर कपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ पासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता किमान प्रतिलिटर २८ रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ ३३ रुपये दर देत आहेत तो सहा रुपये जास्त आहे.

या जास्तीच्या दरामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. त्याचबरोबर गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथून पुढेदेखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल, परंतु दूध पावडर व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ दिसून येत नसल्याने खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघांनी घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

SCROLL FOR NEXT