Nana Patole : नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा? ; राहुल गांधी यांची घेणार भेट

Nana Patole Resigns State President Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
Nana Patole
Nana Patole Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले आहे. काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्याने याचे खापर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडले जात आहे. पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी काही नेत्यांनी केली आहे. यानंतर पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ जागांपेकी २३४ जागा जिंकता आल्या असून यात ४ जागा मित्र पक्षांच्या आहेत. तर भाजपला १३२, शिंदेसेना ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकत मविआचा सुपडा साफ केला.

Nana Patole
Leader of the Opposition in the Legislative Assembly : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचा वानवा

मविआतील काँग्रेसला १६, उद्धव ठाकरे यांना २० तर शरद पवार यांच्या पक्षाने १० जागा जिंकल्या आहेत. यानंतर आता तिनही पक्षात पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर ते आज याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणार असून राहुल गांधी यांची देखील भेट घेणार आहेत. पण याबाबत अद्यापही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

Nana Patole
Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

लोकसभेवेळी घवघवीत यश

पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांची साखळी तयार केली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले होते. पण त्यांना विधानसभेत असे यश मिळवता आले नाही.

पटोलेंचा निसटता विजय

साकोली विधानसभा मतदारसंघातून अखेरच्या क्षणी पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय झाला. पण पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यामुळे काँग्रेसची मोठा हानी झाली आहे.

राजीनाम्याची बातमी अफवा

दरम्यान पटोले यांच्या कार्यालयासह काँग्रेकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नसून त्यांच्या राजीनाम्याची बातमी अफवा आहे. या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात असल्याचा आरोप देखील कार्यालयाने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com