Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Sale: कापसाच्या बियाण्याची विक्री पंधरा मे पासून

Agriculture Department: जूनच्या आधी कापसाची लागवड केली तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने कापसाची लागवड १ जून नंतरच शेतकऱ्यांनी करावी या बाबत कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: जूनच्या आधी कापसाची लागवड केली तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने कापसाची लागवड १ जून नंतरच शेतकऱ्यांनी करावी या बाबत कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या (२०२५-२६) हंगामासाठी कापसाच्या बियाणांची १५ मे नंतर शेतकऱ्यांना विक्री केली जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट कले आहे.

राज्यात साधारण चाळीस लाख हेक्टरच्या जवळपास कापसाची लागवड केली जाते. हा आकडा दरवर्षी कमीजास्त होतो. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भासोबत आता पश्चिम महाराष्ट्रातही कापसाचे लागवड क्षेत्र वाढत आहे. राज्यात २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता.

त्यामुळे कापसाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर शासनाने २०१८ ते २०२४ या काळात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या. त्याचा एक भाग म्हणून १ जूनच्या आधी कापसाची लागवड होणार नाही याची काळजी घेतली.

२०२४-२५ च्या हंगामात प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालेला दिसला. कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाही गुलाबी बोंडअळीला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक असलेल्या हंगामपूर्व कापूस लागवड होणार नाही याची कृषी विभाग काळजी घेत आह

त्यामुळे बियाणांची १५ मे नंतरच विक्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून १ जून नंतरच लागवड होईल याबाबत त्या-त्या भागातील कृषीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी, असे गुणनियंत्रण निविष्ठा संचालकांनी सांगितले आहे. निर्धारीत वेळेच्या आत बियाणांची विक्री केली तर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

असे आहे नियोजन

- १ मे ते १० मे ः उत्पादक कंपनी ते वितरक

- १० मे पासून ः वितरक ते किरकोळ विक्रेते

- १५ मे पासून ः किरकोळ विक्रेते ते शेतकरी

- प्रत्यक्ष लागवड ः १ जून नंतर

यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना १५ मे नंतर बाजारात कापसाची बियाणे मिळतील. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड न करता शेतकऱ्यांनी १ जून नंतरच लागवड करावी. पूर्वहंगामी कापूस लागवड थांबल्यापासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT