Cotton Seed Sale  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed : शेतकऱ्यांकडून कपाशी बियाणे खरेदी सुरू

Cotton Cultivation : गेल्या वर्षी अकोल्यात एका नामांकित कंपनीच्या विशिष्ट वाणांसाठी शेतकरी पहाटेपासून रांगा लावत असल्याचा प्रकार घडला होता. त्या तुलनेत यंदा बाजारपेठेत सामसूम वातावरण पाहायला मिळत आहे.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगाम तोंडावर असताना कपाशीच्या बियाण्यांची विक्री बाजारपेठेत गुरुवार (ता. १६) पासून सुरू झाली. मात्र नेहमीप्रमाणे दिसणारी गर्दी यंदा पहिल्याच दिवशी फारशी जाणवली नाही. गेल्या वर्षी अकोल्यात एका नामांकित कंपनीच्या विशिष्ट वाणांसाठी शेतकरी पहाटेपासून रांगा लावत असल्याचा प्रकार घडला होता. त्या तुलनेत यंदा बाजारपेठेत सामसूम वातावरण पाहायला मिळत आहे.

अकोला जिल्ह्यात या वर्षात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी होऊ घातली आहे. प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात काही विशिष्ट वाणांची मागणी राहते. गेल्या हंगामातील उत्पादनाकडे पाहता या वर्षी ‘रांगा’ लागलेल्या वाणापेक्षा दुसरे वाण बाजी मारण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी मोठ्या गाजावाजात खरेदी झालेल्या ‘त्या’ कंपनीच्या बियाण्याने अपेक्षेप्रमाणे उत्पादन दिले नाही, असा काही शेतकऱ्यांचा अनुभव होता. परिणामी, यंदा त्या वाणाबाबत शंका निर्माण झाली असून त्याचा परिणाम मागणीवर होण्याची चिन्हे सध्या आहेत.

दुसरीकडे, एका दुसऱ्या कंपनीच्‍या वाणाने उत्पादनात बाजी मारल्याने शेतकऱ्यांची पसंती त्याकडे वळण्याची शक्यता आहे. त्या वाणाबाबत यंदा अधिक उत्सुकता असून मागणी वाढण्याची चिन्हे पाहता कंपनीकडूनही मोट्या प्रमाणात कपाशी बियाण्यांची पाकिटे उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी ज्या वाणासाठी रांगा लावल्या, ते अपेक्षेवर उतरले नाही. यंदा अनुभवाने शिकून निर्णय घ्यायचा, असे एका शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे मागील हंगामात गर्दीचा केंद्रबिंदू ठरलेले वाण यंदा मागे पडणार का, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT