Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

BT Cotton Seed Stock : परभणी जिल्ह्यात बीटी कपाशी बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध

Kharif Season : परभणी जिल्ह्यात खरीप हंगामातील कपाशीच्या प्रस्तावित लागवड क्षेत्रानुसार बी.टी. कपाशी बियाण्याच्या १० लाख ७२ हजार ५०० पाकिटांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे केलेली आहे.

Team Agrowon

Parbhani Cotton News : परभणी जिल्ह्यात खरीप हंगामातील कपाशीच्या प्रस्तावित लागवड क्षेत्रानुसार बी.टी. कपाशी बियाण्याच्या १० लाख ७२ हजार ५०० पाकिटांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे केलेली आहे.

परंतु प्रत्यक्षात आजवर कपाशी बियाण्याची १० लाख ७६ हजार पाकिटे बाजारात उपलब्ध झाली. रविवार (ता. १८) अखेर सुमारे ६० ते ७० टक्के बियाणे पाकिटाची विक्री झाली आहे. सोयाबीनचे ६८ हजार ७०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ९५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे. त्यानुसार बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे विविध वाणांच्या १० लाख ७२ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आलेली आहे.

रविवार पर्यंत बियाणे कंपन्यांनी मागणीपेक्षा ३ हजार ५०० पाकिटांचा जास्तीचा पुरवठा केला आहे. उपलब्ध बियाण्याची शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे. जिरायतीमधील लागवड राहिली आहे.

सोयाबीनचे ६८ हजार ७०० क्विंटल बियाणे

जिल्ह्यात यंदा सोयाबीनची २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी १ लाख ८७ हजार ५०० क्विंटल बियाण्याची गरज आहे. ग्रामबीजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांचे घरचे मिळून १ लाख २१ हजार ८७५ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल.

उर्वरित ६५ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे. त्यात ‘महाबीज’कडे २० हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ५ हजार क्विंटल, खासगी कंपन्याकडील ४० हजार ६२५ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

रविवार (ता. १८)पर्यंत सोयाबीनच्या ६८ हजार ७०० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. त्यात महाबीजकडून ९ हजार ५०० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ५ हजार क्विंटल खासगी कंपन्यांकडून ४० हजार ६२५ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या ३ हजार ९२२ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी दीपक सामाले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT