Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Payment : अखेर शेतकऱ्यांना मिळणार २४ तासांत चुकारे

देवळी बाजार समितीअंतर्गत खासगी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून कापसाची खरेदी केली जाते.

Team Agrowon

Wardha News : शेतमालाच्या खरेदीनंतर २४ तासात चुकारे देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याला हरताळ फासत कापूस उत्पादकांना चार ते सहा दिवसांचे धनादेश देऊन त्यांची बोळवण करण्यात येत होती.

या बाबत तक्रारी झाल्यानंतर त्याची दखल घेत देवळी बाजार समितीच्या प्रशासकांनी निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहेत.

देवळी बाजार समितीअंतर्गत खासगी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून कापसाची खरेदी केली जाते. शासन निर्देशानुसार कोणत्याही शेतमालाचे चुकारे व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत करणे क्रमप्राप्त आहे.

परंतु देवळी बाजार समितीअंतर्गत व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या कापसाचे चुकारे देण्यात पाच ते सहा दिवसांचा विलंब केला जात होता. या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्याप्त होता.

याबाबत काही शेतकऱ्यांनी देवळी बाजार समितीकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत बाजार समितीचे प्रशासक प्रकाश भजनी यांनी व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.

या बैठकीत कापूस तसेच इतर सर्व शेतमालाचे चुकारे २४ तासांच्या आत करण्याचे निर्देश देण्यात आले. शिवाय शेतमाल खरेदीची कुवत असलेल्या व्यापाऱ्यांनीच या व्यवसायात पडावे. अन्यथा दुसऱ्यांसाठी ही जागा खाली करून द्यावी, अशी तंबी देखील दिली.

व्यापाऱ्यांनी देखील या वेळी काही मुद्दे उपस्थित करून प्रशासकांनी त्याचे निराकरण करावे, अशी मागणी केली. त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर परिसरातील काही कमिशन एजंट या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो.

जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या परिघात कमी दर्जाच्या कापसावरून हुज्जत घातली जाते. त्यामुळे बाजारात कापूस विक्रीसाठी आणणारा शेतकऱ्याकडे लिलावाच्या वेळी तसेच चुकारा घेताना सातबारा, आधार कार्ड अनिवार्य करावे अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT