Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खरिपाची ५ लाख ११ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season : खरीप २०२५ हंगामात शुक्रवार (ता.२७) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ८९ हजार ५ हेक्टर (५५.७४ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख २२ हजार ५९९ हेक्टरवर (५४.२४ टक्के ) पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : खरीप २०२५ हंगामात शुक्रवार (ता.२७) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ८९ हजार ५ हेक्टर (५५.७४ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख २२ हजार ५९९ हेक्टरवर (५४.२४ टक्के ) पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेतील पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. परंतु कमी पावसाच्या भागातील पेरण्या रखडलेल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४६८ पैकी २ लाख ८९ हजार ५ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात कपाशीची १ लाख ९१ हजार ९५४ पैकी १ लाख २४ हजार ४४६ हेक्टरवर (६४.८३ टक्के) लागवड झाली. सोयाबीनची २ लाख ५४ हजार ५४ पैकी १ लाख ४३ हजार ८५५ हेक्टरवर (५६.६२ टक्के), तुरीची ४२ हजार ६०२ पैकी १६ हजार ४७८ हेक्टर (३८.६८ टक्के) झाली आहे.

मुगाची १७ हजार ६०० पैकी २ हजार ७०७ हेक्टर ( १५.३८ टक्के), उडदाची ६ हजार ४१३ पैकी ९१३ हेक्टरवर (१४.२४ टक्के), ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी २९१ हेक्टर (७.५६ टक्के), बाजरीची ४९९ पैकी २५ हेक्टर (५टक्के) पेरणी झाली. हिंगोली जिल्ह्यात २ लाख २२ हजार ५९९ हेक्टरवर (५४.२४ टक्के) पेरणी झाली.

त्यात कपाशीची २३ हजार ५३० हेक्टरवर लागवड झाली. सोयाबीनची १ लाख ६७ हजार ८६१ हेक्टर, तुरीची २३ हजार ७५० हेक्टर, मुगाची ३ हजार ९० हेक्टर, उडदाची २ हजार १६२ हेक्टर, ज्वारीची १ हजार ८०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यातील अनेक मंडलातील गावांमध्ये अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही.

अनेक भागात पुरेशा ओलाव्याअभावी बियाण्याची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. जमिनीत ओलावा कमी झाल्यामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांना पावसाची गरज आहे. मागील आठवड्यातील पावसामुळे पिकांना जीवदान मिळालेआहे.अद्याप पेरणी न झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT