Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : कापूस लागवड रखडत; कोरडवाहू क्षेत्रात घट

Cotton Sowing : खानदेशात कापसाखालील क्षेत्र पूर्वी नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक होते. एकट्या जळगाव जिल्ह्यातील कापूस लागवड पावणेसहा लाख हेक्टरपर्यंत असायची.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा कापूस लागवड रखडत सुरू आहे. बागायती किंवा पूर्वहंगामी लागवडदेखील कमी दिसत आहे. यात पाऊस हवा तसा नसल्याने कोरडवाहू कापूस लागवडदेखील अल्प असल्याची स्थिती आहे.

कापूस लागवडीत मोठी घट होईल, असा अंदाज सुरुवातीपासून यंदा होता. हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. खानदेशात कापसाखालील क्षेत्र पूर्वी नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक होते.

एकट्या जळगाव जिल्ह्यातील कापूस लागवड पावणेसहा लाख हेक्टरपर्यंत असायची. धुळ्यात सव्वादोन लाख हेक्टर आणि नंदुरबारातही सव्वालाख हेक्टरपर्यंत कापूस लागवड पोहोचत होती. परंतु मागील दोन वर्षे कापूस लागवडीत सतत घट होत आहे.

मागील हंगामात खानदेशात सुमारे सव्वाआठ लाख हेक्टरवर कापूस पीक होते. यंदा खानदेशात कापसाखालील क्षेत्र घट होईल, पण अधिकची घट होईल, याबाबत अंदाज नव्हता. परंतु कापसाखालील क्षेत्रात मोठी घट होईल, अशी स्थिती आहे.

धुळे जिल्ह्यात एकूण लाख दोन लाख १० हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. परंतु तेथेही पूर्वहंगामी व कोरडवाहू कापूस लागवड कमी आहे. पूर्वहंगामी कापूस पिकात शिरपूर तालुका पुढे होता. पण अलीकडे शिरपुरात भाजीपाला व केळी पिकाची लागवड वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक लाख १३ हजार हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे.

परंतु या जिल्ह्यातील लागवड ९० हजार हेक्टरखाली येईल, अशी स्थिती आहे. कापसासठी नंदुरबारात तळोदा व शहादा तालुका पुढे होता. परंतु आता तळोदा व शहादा तालुका बागायती पिकांमध्ये केळी व पपईत अग्रेसर आहे.

तर कोरडवाहू पिकांत सोयाबीन व मका पिकाकडे शेतकरी वळत असल्याने नंदुरबारातील लागवडही घटत आहे. खानदेशातील एकूण कापूस लागवड सात ते सव्वासात लाख हेक्टरपर्यंत होईल, अशी स्थिती आहे.

जळगावातील लागवड अल्प

जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख २२ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पीक आहे. या लागवडीतही यंदा सुमारे २० ते २५ हजार हेक्टरची घट दिसत आहे. तर कोरडवाहू लागवड पावसाअभावी रखडत सुरू असून, सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रात कोरडवाहू कापूस पीक आहे.

जळगाव जिल्ह्यात पाच लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड अपेक्षित आहे किंवा एवढे सरासरी क्षेत्र आहे. पण मागील हंगामातील लागवड पाच लाख ११ हजार हेक्टरवर झाली होती. यंदाची लागवड आणखी कमी होईल, अशी स्थिती आहे. पाऊस लांबल्यास कापूस लागवडीत मोठी घट होईल, असाही अंदाज आहे. यंदा जळगाव जिल्ह्यात चार लाख ६० हजार हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका

Adulteration Issue: दूध, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालन कार्यक्रमांची गरज

Agri Diploma Jobs: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत न्याय देणार; कृषिमंत्री कोकाटे

Banana Harvest: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात

India China Relation: भारत-चीनमध्ये हवा खुला संवाद : एस. जयशंकर

SCROLL FOR NEXT