Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : ‘स्मार्ट’अंतर्गत उत्पादित कापसाच्या बनू लागल्या गाठी

SMART Scheme : शेतकऱ्याने पिकवलेल्या कापसावर प्रक्रिया करून दोन पैसे अधिक मिळावेत या उद्देशाने काम केले जात आहे. जिल्ह्यात या हंगामात शेतकरी गटांनी पिकवलेल्या कापसाच्या आता गाठी तयार करून विक्री केला जाणार आहे.

 गोपाल हागे

Akola News : शेतकऱ्याने पिकवलेल्या कापसावर प्रक्रिया करून दोन पैसे अधिक मिळावेत या उद्देशाने काम केले जात आहे. जिल्ह्यात या हंगामात शेतकरी गटांनी पिकवलेल्या कापसाच्या आता गाठी तयार करून विक्री केला जाणार आहे. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील जय भवानी स्मार्ट कॉटन शेतकरी उत्पादक गटाने पिकवलेला कापूस पहिल्या टप्प्‍यात पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दहीगाव अवताडे येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प (स्मार्ट)अंतर्गत प्रकल्पातील जय भवानी स्मार्ट कॉटन शेतकरी उत्पादक गटाने पिकवलेल्या कापसाच्या गाठी तयार करण्यासाठी कापूस जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये पाठवण्यात आला.

याचा प्रारंभ तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, सरपंच रविकिरण काकड, उपसरपंच धरमशिंग सोळंके, पोलिस पाटील अरविंद अवताडे, गटप्रमुख पल्लवी अवताडे यांच्या हस्ते ट्रॅक्टर ट्रॉली पूजन करून करण्यात आला. अकोला जिल्ह्यात सर्वप्रथम तेल्हारा तालुक्यातील दहीगाव या गावात शेतकरी गटाने पुढाकार घेऊन या प्रकल्पांतर्गत गावात कापसाचा एकच वाण पेरून उत्पादित कापसापासून गाठी तयार करून त्या महाकॉटन मार्फत ऑनलाइन विक्री केल्या जाणार आहेत.

गावातील ३० शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. त्याच्यामार्फत पिकवलेल्या एकूण ५५० क्विंटल कापूस गंगा ॲग्रो जिनिंग फॅक्टरीत पाठवण्यात आला. या वेळी तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, मूल्य साखळी तज्ज्ञ श्रीकांत कराळे (अकोला), सरपंच रविकिरण काकड, गटप्रमुख पल्लवी अवताडे, उपसरपंच धरमशिन सोळंके, मंडळ कृषी अधिकारी रंजना देशमुख, कृषी पर्यवेक्षक रवींद्र माळी, दिलीप बळी, गजानन नागे, अनंत खंडागळे, मल्टी टास्क ग्रेडर विजय वानखडे, कृषी सहायक अनिता डाबेराव, संतोष ठोबारे आदी शेतकरी उपस्थित होते.

पाचशे गाठी तयार करण्याचे उद्दिष्ट

या वर्षी स्मार्ट कॉटन प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास १०० गटांसोबत काम केले जात आहे. प्रकल्पातून एक एकर क्षेत्राचे १०० प्रात्यक्षिके देण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांनी वैयक्तिकरीत्या सहभाग घेतलेला आहे. या वर्षी जिल्ह्यात सुमारे ५०० पेक्षा अधिक कापूस तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मागील हंगामात एक हजारावर गाठी तयार झाल्याची माहिती प्रकल्पाकडून देण्यात आली. कापसाच्या एका गाठीत साधारणपणे १६५ ते १७० किलो रुई राहतो. एक क्विंटल कापसातून ३३ ते ३९ किलोपर्यंत रुईचे उत्पादन होते. म्हणजे एक गाठ पाच ते साडेपाच क्विंटल कापूस प्रक्रिया केल्यानंतर तयार होते. कापूस विक्रीपेक्षा त्यावर प्रक्रिया करून दोन पैसे अधिक मिळवून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT