Cotton Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Sowing : दौंड तालुक्यात वाढतेय कापसाचे क्षेत्र

Cotton Cultivation : वर्षानुवर्षे ऊस पिकाची मक्तेदारी असणारा दौंड तालुका आता कापूस पिकासाठी प्रसिद्ध होऊ लागला आहे. या वर्षी तालुक्यामध्ये सुमारे १ हजार ९२२ एकरांमध्ये कापसाची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी दिली.

Team Agrowon

Pune News : तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये ऊस व कांदा पिकानंतर ‘पांढरं सोनं’ असणाऱ्या कापसाचे पीक बळ धरीत आहे. वर्षानुवर्षे ऊस पिकाची मक्तेदारी असणारा दौंड तालुका आता कापूस पिकासाठी प्रसिद्ध होऊ लागला आहे.

या वर्षी तालुक्यामध्ये सुमारे १ हजार ९२२ एकरांमध्ये कापसाची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी दिली. अवघ्या ५ महिन्यांचे असणारे हे पीक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

कापसाची लागवड साडेचार बाय २ फुटांची सरी काढून शेतीमध्ये बियांचे टोकण केले जाते. दोन खुरपणी केल्यानंतर खते व औषधांचा डोस दिला जातो. सरासरी एकरी १२ ते १६ क्विंटल कापूस निघतो. सध्या शासनाकडून चांगल्या कापसाला प्रति क्विंटल ७ हजार १०० हमीभाव आहे.

चांगला कापूस निघाल्यास पाच महिन्यांमध्ये एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे कापूस पीक घेतल्याने जमिनीचा पोत सुधारतो. तसेच कापसाचे उत्पादन घेतल्यानंतर पुन्हा उसाचे पीक घेतल्यास एकरी सरासरी १० ते २० टन उसाचे उत्पन्न वाढते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

ऊस हंगाम संपल्यानंतर शेत मोकळे ठेवण्यापेक्षा मे ते नोव्हेंबरदरम्यान कापूस लावल्यास पुन्हा जानेवारीमध्ये उसाची लागवड करता येते. दौंड तालुक्यामध्ये वडगाव दरेकर येथील संभाजी वाघमोरे ८ एकर, पोपटराव वाघमोरे यांचा ७ एकर, उत्तम वाघमोरे यांचा ५ एकर, नितीन नागवे यांचा ६ एकर, पेडगाव येथील दादा भुजबळ १० एकर, शिरापूर येथील विकास जगदाळे यांनी ११ एकर, पारगाव येथील हरिभाऊ बोत्रे यांनी २ एकर, शिंदेवाडी येथील महादेव काळे यांनी २ एकर कापसाची लागवड केली आहे. सध्या दौंड तालुक्यात कापूस उत्पादन वाढत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

दौंड तालुक्यात खरेदी केंद्राची गरज

कापूस उत्पादक संभाजी वाघमोरे म्हणाले, की दौंड तालुक्यात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. परंतु तालुक्यात अद्याप खरेदी केंद्राची स्थापना झाली नसल्याने तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये अजनूज, लिंपणगाव, श्रीगोंदा, मिरजगाव येथे विक्रीसाठी नेला जातो. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. शासनाने किंवा दौंड बाजार समितीने दौंडमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्याचा वाहतूक खर्च कमी होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT