Bhukum News : ‘‘संत तुकाराम साखर कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे, तो फायदेशीर ठरला आहे. अतिशय व्यवहारदक्ष राहिल्यामुळे कारखाना नफ्यामध्ये आहे,’’ असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
कासारसाई-दारुंबे (ता. मुळशी) येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात आला. या वेळी देशमुख म्हणाले, की कारखान्यास परवानगी देताना राज्यातील इतर नऊ कारखान्यांना परवानगी दिली होती. बाकी सर्व बंद पडले.
प्रतिकूल परिस्थिती असताना हा कारखाना टिकून फायद्यात आहे यावरून यशाचे गमक ओळखावे. या वेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार विदुरा नवले म्हणाले, की शेतकऱ्यांनी पहिल्यापासून प्रामाणिक साथ दिली.
तसेच प्रत्येक संचालक मंडळाने सहकार्य केले. कारखान्यास खरी ऊर्जा शरद पवार यांनी दिली. त्यांच्यामुळेच प्रगती झाली. देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार) म्हणाले, की भक्तिभावाने कारखाना चालविला जातो.
त्यासाठी नवले यांचे योगदान मोठे आहे. या वेळी माउली दाभाडे, बाळासाहेब काशीद, अनिल लोखंडे, बाळासाहेब विनोदे, बाळासाहेब बावकर, दिलीप दगडे, ज्ञानेश नवले, तुषार भुजबळ, एकनाथ टिळे, पोपट दुडे, दिनेश मोहिते, भाऊसाहेब पानमंद, एस. जी. पठारे, मोहन काळोखे आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.