Cotton Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Disease : कापूस पिकावरील दहिया रोगाचे नियंत्रण

Dahiya Disease : विदर्भातील बहुतांश भागामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र सद्यः स्थितीत वर्धा जिल्ह्यासह काही भागात कापूस पिकावर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

डॉ. निलेश वझिरे, डॉ. जीवन कतोरे

Cotton Farming : विदर्भातील बहुतांश भागामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र सद्यः स्थितीत वर्धा जिल्ह्यासह काही भागात कापूस पिकावर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मागील वर्षीही विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती व वर्धा या जिल्ह्यामध्ये दहिया रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. या वर्षीही रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

लक्षणे

कपाशीच्या पानाचा दही शिंपडल्यासारखे पांढरे ठिपके दिसून येतात. पानाच्या खालच्या बाजूला भुरकट पांढरे चट्टे आणि वरील भागात तांबडे पट्टे दिसून येतात. कालांतराने रोगाचे प्रमाण वाढले की पूर्ण पान खालून वरून भुरकट पांढरे होते.

पाने सुकून गळून पडतात. पानांच्या कडा आतील बाजूने वळतात किंवा पानेच वेडीवाकडी होतात. त्याचा अंतिम परिणाम खोडावर होऊन उत्पादन कमी होते. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत पाने, पात्या, फुले, व अपरिपक्व बोंडे गळून पडतात. परिणामी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असते.

पीक व्यवस्थापन

रोगाचा प्रसार हवेतून होत असल्याने पिकाचे रोगग्रस्त अवशेषांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.

शिफारशीपेक्षा नत्र खताचा अधिक वापर केलेल्या पिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. त्यामुळे नत्राचा शिफारशीपेक्षा वापर टाळावा.

पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असताना फवारणीद्वारे नत्र देऊ नये.

प्रादुर्भाव नियंत्रणासाठी फवारणी (प्रति लिटर पाणी)

पाण्यात मिसळणारे गंधक २.५ ग्रॅम किंवा

ॲझोक्झिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि किंवा

क्रेसोक्झिम मिथाईल (४४.३ टक्के एस.सी.) १ मिलि.

टीप : सकाळी किंवा दुपारनंतर फवारणी करावी. (लेबल क्लेम आहेत.)

-डॉ. निलेश वझिरे (विषय विशेषज्ञ ,पीक संरक्षण), ८००७७७५६१३

- डॉ. जीवन कतोरे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), ९९७००७०९४४

(कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा,जि.वर्धा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT