Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सततचा पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

Team Agrowon

Akola News : गेल्या काही दिवसांपासून तयार झालेले सलग पावसाचे वातावरण, अधूनमधून होणारा पाऊस आता पिकांसाठी मारक ठरण्याची चिन्हे वाढत आहेत. पिकांमध्ये पाणी साचलेले असून सूर्यप्रकाशाअभावी पिके पिवळी पडत आहेत. दुसरीकडे पिकांमधील आंतरमशागतीची कामे प्रलंबित राहत असल्यानेही परिणाम होऊ लागला आहे.

या भागात मागील दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून पाऊस सक्रीय झालेला आहे. दररोज, कधी दिवसाआड पाऊस होत आहे. हा पाऊस रिमझिम स्वरूपाचा अधिक असून सुरुवातीला पिकांसाठी पोषक बनला होता.

आता सततचे पावसाळी वातावरण आणि पाऊस बाधक बनण्याची स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन पिकाची फुलोरावस्था सुरू झाली आहे. या स्थितीत पुरेशा ओलीसोबतच सूर्यप्रकाशही महत्त्वाचा असतो. नेमका पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनची पिके पिवळसर झाली आहेत.

काही ठिकाणी पिकाची अनावश्‍यक वाढही होत आहे. वाढलेल्या झाडांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा दर वर्षीचा अनुभव आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादूर्भाव वाढत चालला. पाने खाणारी अळी सोयाबीनची चाळणी करीत आहे. कपाशीच्या पिकातही मावा, तुडतुडे व इतर किडी दिसू लागल्या. काही ठिकाणी कपाशीच्या फुलांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भावही आढळून आलेला आहे. यामुळे बहुतांश शेतकरी सध्याचे ढगाळ वातावरण निवळण्याची अपेक्षा लावून बसलेले आहेत.

पावसाचा इशारा कायम

दरम्यान, एकीकडे वातावरण खुलण्याची अपेक्षा असताना हवामान खात्याने पुन्हा या भागात चार दिवस पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांना पोषक वातावरणाची आवश्‍यकता बनलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT