Agriculture District Superintendent Gahininath Kapse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Experiment : सेंद्रिय, नैसर्गिक शेतीच्या प्रयोगात सातत्य ठेव

Agriculture District Superintendent Gahininath Kapse : सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

Team Agrowon

Jalna News : सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक प्रशिक्षित शेतकऱ्याने किमान एक एकर क्षेत्रावर प्रयोग करून त्यात सातत्य ठेवावे, असे मत जिल्हा अधिक्षक कृषी गहिनीनाथ कापसे यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्रात पी. एम. किसान उत्सव दिवस साजरा करण्यात आला. तसेच नैसर्गिक शेती या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. कापसे बोलत होते. व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, प्रगतिशील शेतकरी भगवानराव डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यवतमाळ येथून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट लाभार्थींच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आयोजित करण्यात आले होते. कापसे म्हणाले, की शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उत्पादित सेंद्रिय मालाची बाजारपेठ निर्माण करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे, असे ते म्हणाले.

कृषी विज्ञान केंद्राने या वर्षात आतापर्यंत नैसर्गिक शेती या विषयावरील प्रशिक्षणाच्या एकूण सात बॅच पूर्ण केल्या असून त्यातून ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षित केल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सोनुने यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चौधरी यांनी केले तर आभार अजय मिटकरी यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT