Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Rate : वीज दरवाढीच्या विरोधात ग्राहक संघटना आक्रमक

सध्याचे महावितरणचे दर सर्वाधिक आहे. त्यानंतरही दरवाढ ही सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी आहे.

Team Agrowon

Yavatmal News : वीज महावितरण (Mahavitaran) कंपनीने तुटीच्या भरपाईसाठी सरासरी २.५५ रुपये प्रतियुनिट अशा दरवाढीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. ही दरवाढ (Electricity Rate Hike) पूर्णपणे रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी वीजग्राहक संघटना आक्रमक झालेली आहे.

या निर्णयाचा विरोध दर्शविण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला वीजग्राहक संघटना वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करणार आहे.

महावितरणच्या दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातून औद्योगिक, शेतकरी, ग्राहक संघटना व वीजग्राहक यांच्याकडून १५ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्यात येणार आहे. वीजदरवाढीविरोधात जनजागृती केली जाणार आहे.

वीजदरवाढ रद्द करण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले जाणार आहे. याशिवाय वीजदरवाढीला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला वीजदरवाढ प्रस्तावाची होळी केली जाणार आहे.

सध्याचे महावितरणचे दर सर्वाधिक आहे. त्यानंतरही दरवाढ ही सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी आहे. दरवाढीचा परिणाम येणाऱ्या उद्योगांवर होणार आहे. शेतकरी, कृषी अशा सर्वच क्षेत्राला त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी वीजग्राहक संघटनेची आहे.

दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारीला वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्याच्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ वीजग्राहक संघटनेचे प्रशांत दर्यापूरकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT