Indian spices Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

Spice Industry : मसाला उद्योग संघटनेचे अनिल अहिरकर यांची पत्रकार परिषद

Team Agrowon

Nagpur News : विदर्भातील मसाल्याची बाजारपेठ एक हजार कोटींची आहे. यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला असून आघाडीचे ५० ब्रॅण्ड मसाल्यासह तिखट, हळद आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. या उद्योगामुळे विदर्भातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

मात्र, मसाला उद्योगाला वाढती मागणी लक्षात घेता काही देशांकडून भारतीय मसाल्याची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचे अनिल अहिरकर आणि प्रकाश वाघमारे यांनी दिली.

मसाल्यासह तिखट, हळद आणि इतरही उत्पादनाची बाजारपेठ तीन हजार कोटींची आहे, असेही ते म्हणाले. भारतीय मसाल्याची बाजारपेठ बदनाम करण्याचा डाव चीन हा देश करीत आहे. जगभरात भारतीय मसाल्याने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

भारताला विदेशात ‘स्पाईस ऑफ इंडिया’ असेही संबोधण्यात येते. त्याचमुळे विदेशात मोठ्या प्रमाणात भारतीय मसाल्यांसह खाद्य पदार्थांची मागणी वाढते आहे. त्यातून भारतीय गंगाजळीत विदेशी चलन येऊ लागले आहे. भारतीय मसाल्यांना विदेशात बदनाम करण्यात येत आहे.

भारतात अनेक वर्षांपासून खाण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. त्याला काही देशांनी आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे सांगून त्यावर निर्बंध लादले आहेत. तांदूळ, डेअरी उत्पादन आणि हिरवी भाजी आणि मासे यांच्याकडेही संशयाच्या नजरेतून पाहिल्या जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतातील एफएसएसएआय या खाद्य मानांकन करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून मसाल्यांसह खाद्य पदार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनीही विदेशाकडून लावण्यात आलेल्या आरोपींचे खंडन केलेले आहे. मसाल्याचा दर्जा उत्कृष्टच आहे, असे स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेला विलास पोटे, प्रकाश कटारीया, नरेंद्र काळे, चंद्रशेखर तिडके उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Dispute Resolution: पोलिसांच्या पुढाकाराने रस्त्यांचे १०४ वाद मिटले

Bird Flu: दीड हजार कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’

Banana Crop Care : उन्हाळ्यात केळी बागेचे नुकसान टाळण्यासाठी ५ उपाय!

Sangli District Bank: सांगली जिल्हा बॅंकेच्या शताब्दी वर्षात ठेवी १० हजार कोटी करणार

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध

SCROLL FOR NEXT