Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : नवीन पीकविमा धोरणाचा काँग्रेसकडून निषेध

Kharif Season 2025 : राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एका रुपयात पीक विमा योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एका रुपयात पीक विमा योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या काँग्रेस अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयास बुधवारी (ता.२३) निवेदन देऊन नवीन पीक विमा धोरणातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली.

या शिष्टमंडळात मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, मंगळवेढा शहर अध्यक्ष राहुल घुले, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार आणि पंढरपूरचे संदीप पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अडचणी आणि विमा कंपन्यांच्या फायद्याच्या या नव्या योजनेवर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. निवेदनात शेतकऱ्यांच्या आर्थिक ओझ्याबाबत चिंता व्यक्त करताना, पूर्वीप्रमाणे केवळ १ रुपयात विमा योजना राबविण्याची मागणी करण्यात आली.

यंदा शेतकऱ्यांना खरिपासाठी विमा रकमेच्या २ टक्के, रब्बीसाठी दीडटक्के आणि व्यापारी पिकांसाठी पाच टक्के हप्ता भरावा लागत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा आल्याचं सांगण्यात आलं.

या निवदेनात पीक कापणी प्रयोग (CCE) संदर्भातही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. केवळ १२ गावांमध्येच CCE होत असल्याने अनेक गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नसल्याचं अधोरेखित करण्यात आलं. स्थानिक नैसर्गिक आपत्त्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवरही विमा मिळत नसल्याने योजनेचा मूळ उद्देशच फसलेला आहे, असा आरोप करण्यात आला.

याशिवाय ७० टक्के उत्पादन मर्यादेची अट, डिजिटल प्रणालीतील त्रुटी, शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी यांचा पाढा वाचत काँग्रेसने सरकारवर टीका केली. याशिवाय शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीसाठी भरपाई मिळावी, ट्रिगर पॉइंट्स पुन्हा लागू करावेत आणि विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT