Parliament Monsoon Session  Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Monsoon Session : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात कॉँग्रेसचे सरकारला आठ प्रश्न

Operation Sindoor : पहेलगामचा दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर लोकसभेत सोमवारपासून (ता. २७) चर्चा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस पक्षाने केंद्र सरकारला आठ प्रश्न विचारले आहेत.

Team Agrowon

New Delhi News : पहेलगामचा दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर लोकसभेत सोमवारपासून (ता. २७) चर्चा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस पक्षाने केंद्र सरकारला आठ प्रश्न विचारले आहेत. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मध्येच शस्त्रसंधी करण्यात आली.

यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र त्याकडे काणाडोळा करण्यात आला. मात्र आता उशिराने का होईना, वरील विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार झाले आहे, ही स्वागतार्ह बाब असल्याचे कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

पहेलगाम हल्ल्यातील दोषी दहशतवादी पूँछ, गगनगीर आणि गुलमर्ग येथील हल्ल्यातही सामील होते. मग त्यांना आतापर्यंत शिक्षा का मिळालेली नाही? हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.

पंतप्रधान या बैठकीस का उपस्थित नव्हते? ऑपरेशन सिंदूरमध्ये सुरुवातीला झालेल्या चुकांचा उल्लेख सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये केला. अशा प्रकारचे महत्त्वाचे खुलासे भारतात का करण्यात आले नाहीत, असे प्रश्न जयराम रमेश यांनी सरकारला विचारले आहेत.

इंडोनेशियामधील जकार्ता येथे लष्कराचे अधिकारी ग्रुप कॅप्टन शिवकुमार यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे सैनिकी कारवाई बाधित झाल्याचे सांगितले होते. यावर सरकारचे काय म्हणणे आहे? असे सांगत रमेश म्हणतात, की चीनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा मुकाबला भारताला करावा लागल्याचे उपलष्कर प्रमुख राहुल सिंह यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुप्तचर यंत्रणा विफल ठरल्याची कबुली दिली होती. यावरही सरकारने म्हणणे मांडण्याची गरज आहे.

ट्रम्प यांच्या दाव्याबाबत स्पष्टीकरण द्यावे

ऑपरेशन सिंदूर थांबविल्याचा दावा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २६ वेळा केला आहे. भारतासोबतचा व्यापार थांबवला जाईल तसेच भारताची पाच लढाऊ विमाने पाडली गेल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे, यावर देखील सरकारने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT