Insurance scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विम्याच्या परताव्याबाबत संभ्रम

Fruit Crop Insurance Refund Update : हवामानावर आधारित फळपीक विमा परताव्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली तरी अद्याप निम्म्यापेक्षा अधिक मंडलांतील शेतकऱ्यांना हा परतावा मिळालेला नाही.

Team Agrowon

Sindhudurg News : हवामानावर आधारित फळपीक विमा परताव्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली तरी अद्याप निम्म्यापेक्षा अधिक मंडलांतील शेतकऱ्यांना हा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये अस्वसथता पसरली आहे.

जिल्ह्यातील ३८ हजार बागायतदारांनी आंबा, काजुचे क्षेत्र सरंक्षित केले होते. यावर्षी जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सर्व आणि वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण अशी काही मंडले वगळता बहुतांश मंडलांना विमा परताव्याची रक्कम विमा कंपनीकडून देय आहे. ३८ हजार शेतकऱ्यांपैकी ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे ७० कोटींची रक्कम मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील काही मंडलांतील शेतकऱ्यांच्या खाती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली.

१० नोव्हेंबरपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला आंबा आणि त्यानंतर एक दिवसाने काजूचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. मात्र जिल्ह्यातील २५ ते ३० मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप परताव्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नेमका कशामुळे हा परतावा देण्यात आलेला नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

जिल्ह्यात पूर्वी ३९ मंडले होती. त्यामध्ये १८ मंडलांची भर पडली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ५७ मंडले आहेत. मात्र नव्याने सुरू केलेल्या १८ मंडलांमध्ये स्वंयचलित यंत्रे बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना परतावा कोणत्या निकषाने द्यावा यासंदर्भात विमा कंपनीकडून धोरण निश्चित केले जात आहे. त्यामुळे जिल्‍ह्यातील निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचा परतावा रखडला आहे. नव्याने सुरू केलेल्या मंडलांना नजीकच्या स्वंयचलित यंत्र बसविलेल्या केंद्राच्या डाटानुसार हा परतावा येत्या आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

कृषी विभाग विमा कंपनीच्या सातत्याने सपंर्कात आहे. आजदेखील विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे. नव्याने सुरू केलेल्या १८ मंडलांना परतावा देण्याविषयीचे धोरण निश्चित केले जात आहे. सर्व तांत्रिक बाबी दूर करून २५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अररुण नातू, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग
विमा कंपनीकडून जिल्ह्यातील काही मंडलांतील शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. शेतकऱ्यांना देय असलेली परताव्याची रक्कम तातडीने दिली नाही तर २५ नोव्हेंबरनंतर कंपनीच्या कारभाराविरोधात आंदोलन छेडण्यात येईल.
सतीश सावंत, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

Kolhapur Millet Festival: कोल्हापुरात मिलेट महोत्सवात ‘उत्पादक ते ग्राहक’ थेट विक्री

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

SCROLL FOR NEXT