Dr. Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education Development : संमिश्र शिक्षण पद्धती कृषी शिक्षण विकासातील पुढचे पाऊल

Dr. Indra Mani : आभासी (ऑनलाइन) माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : मर्यादित मनुष्यबळावर प्रभावी शिक्षणाचे कार्य करण्यासाठी संमिश्र शिक्षण पद्धती हे शैक्षणिक विकासातील एक महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यी आणि शैक्षणिक व्यवस्थेस मोठा लाभ मिळणार आहे. आभासी (ऑनलाइन) माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शिक्षण संचालनालय आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्‍था यांच्यातर्फे शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) संमिश्र शिक्षण पद्धती (ब्लेंडेड लर्निंग) यावर कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमात डॉ. इंद्र मणी बोलत होते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण संचालक) डॉ. आर. सी. अग्रवाल, संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ. सुदीप मारवा यांची आभासी माध्‍यमातून तर मंचावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्या डॉ. जया बंगाळे, समन्वयक डॉ. प्रवीण कापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अग्रवाल म्‍हणाले, की नवीन शिक्षण पद्धतीमध्ये संमिश्र शिक्षण पद्धतीचे अनन्य असे महत्त्व आहे. त्यात ४० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ॲग्रीदीक्षा, स्वयंम सारख्या आभासी माध्यमाद्वारे नियमित अभ्यासामध्ये मिश्रित करून पूर्ण करता येऊ शकतो. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना वेळेचे योग्य नियोजन करता येईल.

उत्कृष्ट शिक्षणाची समान संधी सर्व विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त होणार आहे. डॉ. मारवा म्हणाले, की संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केल्‍यास विद्यार्थ्‍यांना अध्यापनाकरिता चांगला लाभ होईल. डॉ. खोडके म्हणाले, की भविष्यात विद्यापीठांमध्ये संमिश्र शिक्षण पद्धतीचे प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे विद्यापीठ पूर्णतः तयारी करत आहे.

खुराणा म्हणाले, की संमिश्र शिक्षण पद्धती म्हणजे खडू, फळा आणि वर्ग खोल्या मध्ये शिकवणे यासोबतच आभासी (ऑनलाइन) माध्यमाचे मिश्रण करुन शिकविणे होय. या कार्यशाळेत १५२ प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले. डॉ. सचिन मोरे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. रवी शिंदे, डॉ. संतोष कदम, डॉ. ए. आयबी मिर्झा, डॉ. डि. के. झाटे, डॉ. जी. एम. कोटे, डॉ. अनशुल लोहकरे आदींनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT