Galmukt Dharan Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’ची कामे ऑगस्टअखेर पूर्ण करा

IAS Kumar Ashirwad : "सोलापूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण २५२ कामांना मंजुरी देण्यात आलेली होती. ही सर्व कामे ऑगस्ट २०२४ अखेर पर्यंत सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावीत,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

Team Agrowon

Solapur News : "सोलापूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण २५२ कामांना मंजुरी देण्यात आलेली होती. ही सर्व कामे ऑगस्ट २०२४ अखेर पर्यंत सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावीत,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत श्री. आशीर्वाद बोलत होते. या वेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर. डी. क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एस. एस. पारसे आदीउपस्थित होते.

श्री. आशीर्वाद म्हणाले, ‘‘संबंधित प्रकल्पांतील गाळ काढल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढेल. गाळ शेतात टाकल्यास त्या शेतीची उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळेल. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गाळ काढण्याची मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे.’’

९३ कामे पूर्ण

‘‘जिल्ह्यात २०२३ ते आतापर्यंत १०६ पूर्ण झालेल्या कामातून जवळपास ६५ लक्ष घनमीटर इतका तर २०२४ मधील १४ अपूर्ण कामांमधून ७.३२ लक्ष घनमीटर इतका काळ काढण्यात आला आहे. जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण २५२ कामांपैकी ९३ कामे पूर्ण झालेली आहेत.

तर सद्यःस्थितीत १४ कामे सुरू आहेत. अद्याप सुरू न झालेल्या कामांची संख्या ७७ इतकी आहे. ६८ कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केलेली आहे,’’ अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. दामा यांनी बैठकीत दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT