Jalgaon ZP  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon ZP : जिल्हा परिषदेत तक्रारी, अडचणींवर कार्यवाही होईना

zilla Parishad News : कोविड काळात जिल्हा परिषदेत अनेक दिवस ग्रामस्थांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. अजूनही असाच प्रकार सुरू असल्याची नाराजी शेतकरी, ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्हा परिषदेत मागील अडीच वर्षे प्रशासकराज आहे. ग्रामस्थांसह सरपंच यामुळे त्रस्त झाले असून, बैठका व अन्य कारणांच्या नावांखाली ग्रामस्थांना भेटी नाकारल्या जातात. ग्रामस्थ विविध विभागांत वणवण फिरत असल्याची स्थिती आहे.

घरकुले, पाणी योजना, ग्रामीण रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय सेवा, कृषी सेवा किंवा खते, कीडनाशक यासंबधीची अनेक कामे घेऊन अनेकदा गटविकास अधिकारी कार्यालयानंतर पुढे जिल्हा परिषद मुख्यालयात ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना जावे लागते. परंतु कोविड काळात जशी अधिकाऱ्यांची भेट दुर्मिळ होती, तशीच स्थिती अजूनही आहे.

कोविड काळात जिल्हा परिषदेत अनेक दिवस ग्रामस्थांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. अजूनही असाच प्रकार सुरू असल्याची नाराजी शेतकरी, ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. पाणीपुरवठा, घरकुले, अंगणवाड्या, इमारत बांधकाम किंवा दुरुस्ती, पशुसंवर्धन विभागासंबंधीच्या अडचणी सोडविताना सरपंच, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंडळीला अजूनही अडचण येत आहे.

कारण प्रशासकराजमध्ये अधिकाऱ्यांकडूनच कामे मार्गी लागू शकतात. अन्य कुणी यात अधिकार गाजवून काम करवून घेवू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिकची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली. पण निवडणुका झाल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंचायत समित्या, जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ही निवडणूक रखडली आहे.

सध्या तक्रार अर्जदेखील मार्गी लावला जात नसल्याची स्थिती आहे. पाणीपुरवठा, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, पशुधनाचे आजार निवारण व सर्वेक्षण, रस्ते बांधकाम आदी महत्त्वाचे मुद्दे सध्या आहेत. हेच मुद्दे मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. ग्रामस्थ, तक्रारदार यांना अधिकाऱ्यांना भेटू दिले जात नाही.

तक्रार असल्यास ती लेखी स्वरूपात जिल्हा परिषदेच्या टपालात द्यावी लागते. पदाधिकारी किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्य नसल्याने त्यांच्याकडून कामे करवून घेता येत नाहीत. काही मर्यादा असल्याने रोज तक्रारीचा पाठपुरावा मात्र ग्रामस्थ करू शकत नाहीत.

कारण तक्रार कुठल्या टेबलावर आहे, त्यावर काय कारवाई, कार्यवाही केली जात आहे, याची माहिती ग्रामस्थांना थेट संवाद साधून मिळू शकत नसल्याची स्थिती जिल्हा परिषदेत आहे. अनेक विभागांमध्ये कर्मचारी नसतात तर काही वेळेस अधिकारी बैठकांत व्यस्त असतात. रोजचा हाच प्रकार सुरू असल्याचे अनेक सरपंचांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT