Dr Suhas Divase Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Land Reform: माझी जमीन माझा हक्क मोहिमेसाठी समितीची स्थापना

Majhi Jamnin Majha Hakk: राज्य शासनाच्या ‘माझी जमीन, माझा हक्क’ मोहिमेला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी महसूल विभागाने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘माझी जमीन माझा हक्क’ या मोहिमेसाठी महसूल विभागाच्या वतीने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महसूल आणि भूमिअभिलेख विभागामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची जमीनविषयक कामे करण्यासाठी विविध कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रके यानुसार कामकाज करण्यात येत असते. मात्र, महसूल विभागाचे कामकाज सर्वसामान्य नागरिकांना समजावे, त्यातील किचकट नियम लक्षात यावेत.

यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असते. मात्र हे अभियान अल्प काळासाठी असते. ही बाब लक्षात घेऊन महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग, तसेच भूमिअभिलेख विभागातील कामकाजाची सोडवणूक करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. या बाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी प्रतापसिंह खरात यांनी जारी केला आहे.

समितीची कार्यकक्षा :

महसूल, मुद्रांक व नोंदणी आणि भूमिअभिलेख विभागाशी निगडीत निवडक कामांचा शोध घेऊन ती कामे निश्‍चित करणे, महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतुदी, तसेच इतर कायद्यातील तरतुदी, शासन निर्णय, नियम, परिपत्रके यांचा अभ्यास करणे, विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करणे आणि निवडण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन करणे, तसेच त्याची मानके निश्‍चित करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Orchard Management: हस्त बहराचे नियोजन हवे आतापासूनच

Water Saving Strategies: कमतरतेच्या स्थितीत पाणी बचतीच्या उपाययोजना

Groundwater Recharge Technology: कूपनलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेच्या निकषात होणार बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शासन निर्णय जारी

Buldhana Water Crisis: बुलडाणा जिल्ह्यातील ३८ गावांची तहान टँकरवर

SCROLL FOR NEXT