APMC Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Reforms : कृषी बाजार समित्यांच्या कारभारातील सुधारणांसाठी समिती

Maharashtra Agriculture Market: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी शासनाने पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती परवाना नुतनीकरण, शुल्कवाढ, सल्लागारांचे मानधन आणि कर्मचाऱ्यांच्या लाभांविषयी अभ्यास करून २० मार्चपर्यंत अहवाल सादर करणार आहे.

Team Agrowon

Mumbai News: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती बाजार समित्यांचा अभ्यास करून २० मार्चपर्यंत अहवाल सादर करणार आहे.

खासगी बाजार परवाना नुतनीकरण, एकल परवाना फी वाढ, पणन संचालक स्तरावरून विविध प्रकल्पांसाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांची फी निश्चिती, पणन मंडळाच्या अंशदानातून जमा होणारी रक्कम, पर्यवेक्षण फी, बाजार समिती कर्मचाऱ्यांना ग्रुप विम्याचा लाभ आदी बाबींचा ही समिती अभ्यास करणार आहे.

सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पणन संचालनालय आणि पणन मंडळाच्या कामांबाबत सुधारणा असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे ज्या सुधारणा करायच्या त्याचा सांगोपांग अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार शासन आदेश काढत समिती नेमली आहे. या समितीत पणन सचालनालयाचे सहसंचालक सदस्य सचिव असतील तर पणन संचालक, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, पणन विभागाचे उपसचिव या समितीचे सदस्य असतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT