Pune Collector Jitendra Dudi Agrowon
ॲग्रो विशेष

Collector Jitendra Dudi: प्रस्तावित कामे ३१ जुलैच्या आत सुरू करा : जिल्हाधिकारी

Pune Development Works: पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतील सर्व कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैच्या आत सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत श्री डुडी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपल्या प्रस्तावास तत्काळ तांत्रिक मान्यता घ्यावी. २५ जूनपूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सर्व प्रस्तावित कामे ३१ जुलैच्या आत सुरू करावीत, डिसेंबर २०२५ अखेर सर्व कामे पूर्ण करावीत. वरिष्ठ स्तरावरून घ्यावयाच्या मान्यतासंदर्भात पाठपुराव्याकरिता यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ‘नावीन्यपूर्ण योजना’ यामध्ये नावीन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन शाखेत तात्काळ सादर करावेत. या संदर्भात कृषी, महिला व बालविकास, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नावीन्यपूर्ण विभाग, शिक्षण, पोलिस आदी विभागांनी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची मागणी नोंदवून प्रस्ताव सादर करावेत. असे त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर राज्य शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामध्ये सर्व विभागांनी आपापला सहभाग नोंदवून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.

या वेळी जिल्ह्यातील सर्व विभागांना एक कोटी उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागासाठीच्या उद्दिष्टांचे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), पुणे यांनी कार्यक्रम नियोजनाचे सादरीकरण केले. बैठकीला सर्व कार्यान्वित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT