ॲग्रो विशेष

Orange Fruit Drop : संत्रागळती नियंत्रणात अन्नद्रव्यांचे महत्त्व

Orange Farming : संत्रापट्ट्यात फळगळतीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचे नियंत्रणासाठी जमिनीची आणि झाडांची अन्नद्रव्यांची पूर्तता केली पाहिजे.

Team Agrowon

Nagpur News : संत्रापट्ट्यात फळगळतीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचे नियंत्रणासाठी जमिनीची आणि झाडांची अन्नद्रव्यांची पूर्तता केली पाहिजे. त्याकरिता कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत यांसारख्या घटकांच्या वापरावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन पंजाबराव देशमुख ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रकाश कडू यांनी केले.

‘सकाळ - ॲग्रोवन’ आणि प्रयोगशील शेतकरी भीमराव कडू यांच्या संयुक्‍त सहकार्याने पार्डी देशमुख (ता. कळमेश्‍वर) येथे आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत गुळादे होते. डॉ. कडू पुढे म्हणाले, की कोणत्याही पिकाचा दर्जा राखण्यासाठी त्या पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा टप्पा ठरतो.

जमिनीचा सेंद्रिय कर्ब योग्य असल्यास त्या माध्यमातून पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यातून देखील कीड-रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य जपले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. ॲग्रोवनचे वितरण व्यवस्थापक दिनेश टोंगे यांनी प्रास्ताविकातून ॲग्रोवनचे दैनंदिन शेती व आर्थिक व्यवस्थापनातील महत्त्व पटवून दिले.

कळमेश्‍वर तालुका कृषी अधिकारी योगीराज जुमडे यांनी जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी खताचा मर्यादित वापर आणि सेंद्रिय खताचा योग्य वापर यावर भर देण्याचे आवाहन केले. जमिनीच्या सुपीक थराच्या संवर्धनाचे महत्त्व त्यांनी विशद केले. प्रयोगशील शेतकरी भीमराव कडू यांनी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले.

जमिनीचा पोत राखत त्यांनी आपल्या शेतात फळगळती कशी नियंत्रणात ठेवली याविषयी देखील त्यांनी सविस्तर विवेचन केले. या वेळी जमीन आरोग्य राखण्यांसदर्भातील विविध मुद्यांवर त्यांनी शास्त्रोक्‍त माहिती दिली.

या वेळी ॲग्रोवन द्विशकतपूर्तीच्या निमित्ताने भीमराव कडू, निकेश बागडे (मोहपा) या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांचा ॲग्रोवन शेतकरी ट्रॉफी देत सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धार्थ गोंडाने यांनी केले. ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी शशांक पावडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT