Cold wave Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Cold wave Maharashtra : मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट, राज्यात पावसाची शक्यता आहे का?

Weather Update : राज्यात हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अद्यापतरी पावसाची कुठेही शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

sandeep Shirguppe

Bay Of Bengal Cyclone : बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु राज्यात हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अद्यापतरी पावसाची कुठेही शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे पाच दिवस कोरडे वातावरण राहणार आहे. तर पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागात थंडी प्रमाण वाढणार आहे.

राज्यात आजपासून पुढचे दोन दिवस पाऊस पडेल असे बोलले जात आहे परंतु हवामान विभागाकडून असे कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. दरम्यान राज्यात पुढच्या ४८ तासात उत्तर भारतात थंडी वाढणार असल्याने याचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच बिहारमध्ये पुन्हा थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ४.८ अंश सेल्सिअसवर घसरले होते. दिल्लीतही पारा ४ अंशांवर आला होता. त्यामुळे देशभरात पुढील २४ तासांत थंडीचा जोर आणखी वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

उत्तर भारतात थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. २१) हरियानातील हिस्सार यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ७ अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही हवामान स्थिती कायम आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने किमान तापमानात चढ- उत्तार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून, धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT