Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग करणं हीच राज्य सरकारची भूमिका; विधीमंडळात मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण

Shaktipeeth Highway Devendra Fadanvis : शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळात उमटले. विरोधकांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर विधीमंडळात या प्रश्नावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महामार्ग करण्याची भूमिका राज्य सरकारचं स्पष्ट केलं.

Dhananjay Sanap

Vidhimanal Live : शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. परंतु तो लादायचा नाही, अशी राज्य सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बुधवारी (ता.१२) केलं. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करूनच शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शक्तिपीठ महामार्गावरून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध करण्यासाठी आझाद मैदान ते विधिमंडळावर मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळात उमटले. विरोधकांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर विधीमंडळात या प्रश्नावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महामार्ग करण्याची भूमिका राज्य सरकारचं स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या महामार्गाला पाठिंबा असल्याचं सही केलेलं पत्र दिलं आहे. त्यात काही खोटं असेल तर आमच्यावर कारवाई करा असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारने महामार्ग रद्द करू नये, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे." असंही फडणवीसांनी विधीमंडळात सांगितलं.

पुढे ते म्हणाले, "शक्तिपीठ केवळ अस्थेच्या स्थळांना जोडणारा मार्ग नाही. तर शक्तिपीठमुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा मार्ग आहे. तसेच विदर्भातील एक दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा अट्टहास नाही. तर जवळपास १२ जिल्ह्यांचं जीवनमान बदलून टाकणारा महामार्ग आहे. समृद्ध सारखंच या महामार्गाने परिवर्तन होणार आहे." असा दावाही फडणवीस यांनी विधीमंडळात केला.

यावर विरोधी पक्षातील कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मात्र राज्य सरकारला नागपूर रत्नागिरी महामार्ग असल्याचं सांगितलं. तसेच मोपाला जाण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की, थोडा सकरात्मक दृष्टीकोन ठेवावा, असं सतेज पाटील म्हणाले. तसेच आज आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवावं, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

यावेळी पाटील म्हणाले, "राज्य सरकारने एकच बाजू ऐकून निर्णय घेऊ नये, आत्ता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सह्यांचं पत्र दिलं आहे. तेही आम्हाला द्यावं. कारण ज्यांनी संमती दिली त्याचाच या महामार्गाला विरोध आहे." असंही सतेज पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT