Kolhapur Crop Damage agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Crop Damage : ढगाळ वातावरणाचा भाजीपाला पिकांवर परिणाम, शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका

Bay Of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे रविवार (ता.०८)पासून हवामानात बदल झाला असून दिवसभर हवामान पावसाळी व कोंदट झाले आहे.

sandeep Shirguppe

Cloudy Weather Affects Vegetable Kolhapur : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा, शाळू, वांगी, टोमॅटो या पिकांसह पालेभाज्या आणि भाजीपाला पिकाला धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांना कीड- रोगांचा धोका वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत असून उत्पादनाचा खर्च वाढत आहे.

तसेच कोल्हापुरातील गुऱ्हाळ घरांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गुऱ्हाळासाठी लागणारे जळण भिजल्याने गुऱ्हाळ घरेही ५ दिवस बंद अवस्थेत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी यामुळे संकटात सापडला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे रविवार (ता.०८)पासून हवामानात बदल झाला असून दिवसभर हवामान पावसाळी व कोंदट झाले आहे. बुधवारपासून(ता.११) दिवसभर सूर्यदर्शन झाले, मागील दोन दिवसांपासून मात्र ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शिरोळ तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

वांग्याचे उत्पादन घेणारे शेतकरी सुनिल लडे म्हणाले, आम्ही ६० गुंठ्यात सध्या वांगी उत्पादन घेत आहे. मागील १५ दिवसांपासून आम्ही वांग्याची तोड घेण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात वांगी चांगली होती. परंतु मागच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे वांग्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आमच्या उत्पादनावर याचा परिणाम होत असल्याचे शेतकरी लडे म्हणाले.

गूळ उत्पादक शेतकरी भगवान काटे म्हणाले, "दोन दिवस झालेल्या पावसामुळे गुऱ्हाळघरांसाठी लागणारे जळण पूर्ण भिजले आहे. या पावसामुळे दोन ते तीन दिवस गुऱ्हाळघरे बंद ठेवावी लागणार असून, यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘गुळाला भाव नाही, कामगार मिळत नाहीत, अशा अनेक अडचणींचा सामना करत गुऱ्हाळघर चालक गूळ उत्पादन करीत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेली गुऱ्हाळघरांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आली आहे. त्यातच अवकाळी पावसाने गुऱ्हाळमालक अडचणीत आले असल्याचे काटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT