Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सोमवारी (ता. २३) सायकांळी अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात झालेल्या पावसामुळे दोनही घाटरस्त्यांमध्ये दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे भुईबावडा घाटात शेकडो वाहने अडकली होती. दरडी हटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधारेने हळव्या भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवलीच्या पूर्वपट्ट्यातच पावसाच्या सरी बरसत होत्या. परंतु रविवारी सायकांळी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून पावसाचे वातावरण होते.दुपारनंतर विजांच्या गडगडाटांसह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाला सुरुवात झाली.

अनेक भागात मुसळधार पाऊस पडत होता. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास करूळ आणि भुईबावडा घाट परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे वाहतूक सुरू असलेल्या खारेपाटण-कोल्हापूर मार्गावरील भुईबावडा घाटरस्त्यात दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या.

त्यामुळे शेकडो वाहने घाटरस्त्यांमध्ये अडकली. काही वाहनांचे नुकसानदेखील झाले. दरम्यान त्यानंतर रात्री पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गगनबावड्यातील वाहने राधानगरी मार्गे वळविली तर वैभववाडीतील वाहने फोंडाघाटमार्गे वळविली. सध्या दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान सध्या वाहतुकीस बंद असलेल्या करूळ घाटात देखील दहा ते बारा ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

जिल्ह्यात आज पहाटेपासून देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या सरीवर सरी सर्वत्र पडत आहे. किनारपट्टी भागात देखील पावसाचा जोर वाढला आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळी देखील झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे हळव्या भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lalkandhari Cow Breed : लालकंधारीने दिले १६ वेत...

Bank Representatives : बॅंकांच्या ७० हजार व्यवसाय प्रतिनिधींनी काम थांबवले

Maratha Reservation : धुळे-सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’

Hunger Strike : सोयाबीनच्या दरासाठी औशात ट्रॅक्टर रॅली

POCRA Scam : ‘पोकरा’ घोटाळ्यातील अधिकाऱ्याला कारवाईऐवजी बढतीचे बक्षीस

SCROLL FOR NEXT