Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस

Latest Rain Update : ढगफुटीसदृश पावसाने वैभववाडी शहरात बुधवारी (ता. ४) सायंकाळी दाणादाण उडवली.

Team Agrowon

Sindhudurg News : ढगफुटीसदृश पावसाने वैभववाडी शहरात बुधवारी (ता. ४) सायंकाळी दाणादाण उडवली. शहरात जिकडेतिकडे पाणीच पाणी साचल्याचे चित्र होते. दरम्यान आठवडाबाजारात आलेल्या भाजी व्यापाऱ्यांच्या साहित्यात पाणी शिरल्याने त्यांची धांदल उडाली. जिल्ह्याच्या इतर भागांतदेखील पावसाच्या सरी पडल्या. गुरुवारी (ता. ५) पहाटे धुके पसरले होते त्यानंतर ऊन पडले होते.

जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. बुधवारी सकाळपासून जिल्ह्याच्या सर्व भागांत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर काही काळ कडक ऊनदेखील पडले. परंतु दुपारी दोन-अडीचच्या नंतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान, वैभववाडी तालुक्यात दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या पाच ते सहा मिनिटांत वैभववाडी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरात तासभर ढगफुटीसदृश पाऊस झाला.

न थांबता झालेल्या पावसाने शहरात चांगलीच दाणादाण उडाली. शहरातील संभाजी चौकाच्या दोनही बाजूला गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्यावरूनदेखील पावसाचे पाणी वाहत होते. हे पाणी रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी व्यापाऱ्यांच्या साहित्यात शिरल्यामुळे त्यांची चांगलीच धांदल उडाली.

पावसामुळे आठवडा बाजारातील सर्व गर्दी पांगली. वैभववाडी शहर वगळून तालुक्यात इतर भागांत पावसाचा जोर कमी होता. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्येदेखील पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी जोरदार सरीदेखील झाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT